गंगाखेड मध्ये प्रवासी दिन उत्साहात साजरा-प्रवासी व कर्मचारी यांच्यातील दुवा प्रवासी महासंघ- गोपाळ मंत्री

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28 जानेवारी):-रथसप्तमी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवासी महासंघ तालुका शाखा गंगाखेड व ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड येथे प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमित्त स्वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी मनोगत व्यक्त करताना प्रवासी महासंघ हा कर्मचारी व प्रवासी यांच्यातील दुवा बनून सर्वांना सहकार्य करेल व सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

बस स्थानकावर परिवहन मंडळाचे सहायक वाहतूक अधीक्षक रामेश्वर हडबे ,सहायक वाहतूक निरीक्षक माऊली मुंढे तसेच उपस्थित बस चालक ,वाहक , सफाई कर्मचारी ,महिला ,पुरुष, शालेय विद्यार्थी आदी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर अमरेश कुमार श्रीवास्तव , बुकिंग क्लर्क सदाशिव सोळंके , आदित्य तिवारी, सचिन पट्टेकर, रेल्वे पोलीस मोतीराम काळे ,सतीश मिश्रा,सफाई कर्मचारी ,महिला व पुरुष प्रवासी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री, यांच्यासह प्रवासी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य अनंत काळे, नंदकुमार सोमानी, संजय बचाटे , अनिल साळवे, लक्ष्मण दुधाटे, केशव देशमुख,संजय सुपेकर, सोपान टोले, सुधाकर चव्हाण, संघटक सूर्यमाला मोतीपवळे, पद्मजा कुलकर्णी, प्रेमलता नावंदर,आशाताई रेघाटे, सुनिता घाडगे, आदींची उपस्थिती होती.