होरकड येथे भीम टायगर सेनेच्या फलकाचे अनावरण सोहळा संपन्न

62

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28जानेवारी):-तालुक्यातील होरकड येथे दि.१४ जानेवारी नामविस्तार दिन मराठवाडा विद्यापीठ व दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फलकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भीम टायगर सेनेच्या फलकासमोर भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे व प्रा. महेश हंबर्डे यांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती व पुष्प वाहून पूजन करण्यात आले.त्यानंतर रीतसर रिबीन कापून फलकाचे अनावरण करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुबेर मस्के होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. महेश हंबर्डे व भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे,विष्णू सरकटे,अण्णा दोडके,तालुकाध्यक्ष प्रभाकर खंदारे,दीपक गायकवाड,प्रीतम आळणे,गौतम खडसे,प्रा.छाया हंबर्डे,भीम टायगर सेनेच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख गीता कांबळे,आम्रपाली केवटे,संजय शेळके,गजानन कांबळे, राजकुमार पठाडे,राहुल झिंजारे, सतीश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास खंदारे ब्रह्मी यांनी केले‌.

याप्रसंगी प्रा.महेश हंबर्डे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भीम टायगर सेनेच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले.नंतर विष्णू सरकटे,प्रा. छाया हंबर्डे,गीता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अशावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी सविस्तरपूर्वक मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी धम्मदीक्षा वाहुळे, लातूरकर आणि संच यांचा प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास खंदारे यांनी केले तर शाखाप्रमुख बबन पाईकराव यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते,पदाधिकारीसह बबनराव पाईकराव, संजय मांडे, बाळू मिरडकर, कैलास कांबळे, लिंबाराव मस्के, विलास खंदारे, बबन मिरजकर, सिद्धार्थ पाईकराव, किसन पवार, शिलानंद पाईकराव,शिवाजी मस्के,भिकाजी देव्हारे,सुधीर कांबळे,अविनाश गोरे तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत पाईकराव,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केल.