म. गांधी यांच्या स्मृतिदिनी जिल्हा काँग्रेस तर्फे ध्वजारोहण करून भारत जोडो यात्रेचा समारोप

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30जानेवारी):- काँग्रेस नेते श्री राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत प्रेम आणि ऐकतेचा संदेश घेऊन निघालेली ” भारत जोडो यात्रा” 3500 पेक्षा अधिक किलोमीटर पैदल प्रवास करून अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनी 30 जानेवारी रोजी जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगर येते पोहचली.त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून जिल्हा कार्यालयात ध्वजरोजन करण्यात करन्यात आले व भारत जोडो यात्रेचे औपचारिक रित्या समारोप करण्यात आले.

जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, सहकार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, ता. अध्यक्ष वसंत राऊत, सुरेश भांडेकर, राकेश रत्नावार, संजय चन्ने, सुभाष धाईत, गुलाब मडावी, चारुदत्त पोहने, जितेंद्र मुनघाटे, नृपेश नांदनकर, बंडू चिटमूनवार कमलेश खोब्रागडे, प्रफुल आंबोरकर, जावेद खान, मिलिंद बारसागडे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.