मयूर मेश्राम यांची “ग्लोबल ह्यूम्यानिटी पुरस्कार-2023” ह्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी विशेष निवड

25

🔹रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजस्थान येथे होणार पुरस्कार प्रदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.31जानेवारी):-एवढ्या कमी वयात समाजाची बंधन झुगारून त्यांनी टाकलेल मोलाचं पाऊल यशस्वी ठरते आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यांच्या मनात एक सल कायमचीच होती ती म्हणजे लोकांच्या अंधःकारमय जीवनात प्रकाश आणण्यास आपला हातभार असावा. समाजाचा विकास नवी पहाट घेऊन उदयास यावा, ही संकल्पना घेऊन ब्रम्हपुरी येथील युवक मयूर मेश्राम (28) यांनी स्वतःला समाजाप्रती वाहून घेतले आहेत. त्यांच्या कार्याने समाजकार्याची दखल घेऊन, राजस्थान राज्यातील बिकानेर मधील राष्ट्रहित फाऊंडेशन मार्फत 12 मार्च 2023 रोजी एका भव्य दिव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात “ग्लोबल ह्यूम्यानिटी पुरस्कार- 2023” ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्य कोणतेही असो पण आपण मात्र सदैव तयार. संकट असो आनंद असो घेतलेला निर्णय आजपर्यंत सर्वमान्यच ठरला आहे.

सामाजिक तसेच रक्तदान क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाते, असे नाभिक समाजातील युवारत्न मयूर प्रदीप मेश्राम हे आहेत. ज्या वयात स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या वयात यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.. कोरोना महामारीच्या काळातही त्याची सेवा प्रशंसनीय आहे. आयुष्याचाच अर्थ एवढा व्यापक आहे की त्यांच्या प्रत्येक स्पंदनात मानवता सामावलेली आहे.

काही मानसांत नाते जरी रक्ताचे नसले तरीही माणुसकीच्या नात्याने रक्त देण्यास मागेपुढे विचार न करणारे मयूर मेश्राम आहेत .कार्यक्रमाचे आयोजन ‘राष्ट्रहित फाऊंडेशन’ बिकानेर चे आयोजक मेवा सिंघ सर पूर्व आर्मी ऑफिसर, सुचित्रा ताई अहिरे, रुपाली ताई सिंघाइ,मैत्री परिवार बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अभिदादा ठाकूर, तसेच कार्यक्रमाचे आयोजन मेवा सिंघ सर पूर्व आर्मी ऑफिसर यांनी केलेले आहे.