नागभीड येथे ‘रंगारंग’ उत्साहात साजरा….

🔹विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा केला सत्का

✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागभीड(दि.31जानेवारी):-स्व.प्रसाद राऊत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘रंगारंग’ हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात साजरा झाला. यात नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील अनेक शाळा,महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. राजन जयस्वाल सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागभीडचे ठाणेदार राजु मेढे , नागभीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ , डॉ.अमीर धमानी सर, रंगारंग चे संयोजक संजय गजपुरे,नागभीड पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले ,बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. रविन्द्र चौधरी , प्रा.डॉ.मोहन जगनाडे सर,प्राचार्य डॉ.गणपत देशमुख सर,प्राचार्य देविदास चिलबुले सर, अजयजी काबरा ,नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,जनता विद्यालयाचे प्राचार्य मीलेश राऊत सर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला कोरोना काळात निधन झालेल्या रंगारंग च्या संयोजकांपैकी मनोज कोहाड, राजुभाऊ मेश्राम व तनवीर कुरेशी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .

यावेळी गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व जनता शिक्षन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.अमीर धमानी सर,गोंडवाना विद्यापीठाच्या नवनियुक्त सिनेट सदस्य सौ.किरण संजय गजपुरे, नागभीड तालुक्यातील पहिली कंपनी सेक्रेटरी अभिलाषा राजन जयस्वाल, यांचा भारताचे संविधान प्रत,शाल,श्रीफळ,व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.विना नागमोती व माधुरी राऊत यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गात कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व कोरोना या थिमवर अनेक शाळांनी आपले नृत्य सादर केले.. प्रत्येक सहभागी शाळांना अँड.आनंद घुटखे यांच्या सौजन्याने संविधान प्रत देण्यात आली तसेच प्रसाद स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व्यापारी संघाचे माजी.अध्यक्ष हनिफ भाई जादा यांच्या कडून नाश्ता ची सोय करण्यात आली. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद पतसंस्था , आपुलकी फाऊंडेशन व झेप निसर्गमित्र संस्था यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर,स्वप्नील नवघडे,सतीश मेश्राम सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रंगारंग चे संयोजक अमित देशमुख, पवन नागरे,संजय ठाकरे , ओमप्रकाश मेश्राम,विजय बंडावार,अमोल वानखेडे,गुलाब राऊत, विवेक गोहणे , प्रशांत राहुड, प्रीतम रगडे, क्षितिज गरमळे, जितेन्द्र वानखेडे , रितेश कोरे,रोमी कटारे,प्रवीण बंडावार,सतीश जीवतोडे, विरु गजभिये,अविनाश मदनकार,प्रशांत भुरे यांनी अथक प्रयत्न केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED