शिवणपायली येथे २ व ३ फेब्रुवारी ला बौद्ध धम्म परिषद

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1फेब्रुवारी):-मिलिंद बुद्ध विहार स्मारक समिती तथा बौद्ध पंच कमेठी शिवणपायलीच्या वतीने सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन व दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजन 2 व 3 फेब्रुवारी ला करण्यात आले आहे.

या सोहळ्यात बौद्ध धम्म परिषदेत विविध कार्यक्रम ची रेलचेल राहणार आहे. २ फेब्रुवारी ला सकाळी उपासक व भुक्कु संघाद्वारे बौद्ध धम्म धवजरोहन करण्यात येईल. दुपारी १२ वाजता बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन प्रज्ञाताई राजूरवाडे यांच्या हस्ते होईल,अद्यक्ष पी एम डांगे,संविधान अभ्यासक लेखक प्रेमकुमार खोब्रागडे,चंद्रमनी घोंनमोडे,जिंदा भगत,प्रवीण खोब्रागडे, जीवन बागडे,देवेश कांबळे,प्रशांत डांगे,किशोर अंबादे,जी टी खोब्रागडे, विकास खोब्रागडे,सरपंच वैशाली निकोडे,नर्मदा रामटेके,पोलिस पाटील महेंद्र डेकाटे,रमेश राऊत,नागनाथ फुलझेले या वेळी यांची उपस्थिती राहील.

धम्म क्रांतीचे पाच सूत्रे,बाबासाहेब अपेक्षित समाज निर्मिती या विषयावर दुपारी प्रबोधन सत्र होणार आहे, याला प्रमुख वक्ता प्रेमकुमार खोब्रागडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे,सायंकाळी ७ वाजता प्रबोधनकर सप्तखणजेरी वादक तुषार सुर्यवंशी नागपूर यांच्या संगीतमय तुफान विनोदी प्रबोधन कार्यक्रम राहणार आहे.

३ फेब्रुवारीला धम्म रॅली, शीलग्रहण,परित्रांण पाठ,भिक्कु संघाची धम्मदेशन व मंगलमैत्री पूज्य भदंत शिलांनद महास्थविर, पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थविर,संगारामगिरी,भिक्कु सोन सोनी टेकडी वडसा,भिक्कु अनुत्तर,भिक्कु सोनुत्तर,भन्ते धम्मवन,यांच्या उपस्थितीत मंगल मैत्री होणार आहे, या बौद्ध धम्म मेळावच्या लाभ घ्यावा असे आव्हान मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभूमी स्मारक समिती शिवणपायली यांनी केले आहे.