जिल्हास्तरीय स्पर्धेत दहिवडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1फेब्रुवारी):-क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व
सातारा जिल्हा अष्टे डू मर्दानी आखाडा यांच्या वतीने सातारा जिल्हास्तरीय शालेय अष्टे डू मर्दानी आखाडा स्पर्धा खंडाळा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये हस्तकला व शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी मधील एकूण नऊ विद्यार्थ्यानी आपला जलवा दाखवत गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई केली.

यामध्ये स्नेहल अवघडे (गोल्ड मेडल), वैष्णवी भोसले (गोल्ड मेडल),साक्षी गोसावी ( गोल्ड मेडल),प्रणाली कुंभार गोल्ड मेडल,दीक्षा जाधव( गोल्ड मेडल),ओंकार वसव (गोल्ड मेडल ),चैतन्य कुंभार (गोल्ड मेडल), सिद्धी वाघमोडे (सिल्वर मेडल ), तनुजा माने (सिल्वर मेडल ), साक्षी शिंदे (सिल्वर मेडल ), मोहिनी खवळे( सिल्वर मेडल ) या विद्यार्थ्यांनी हस्तकला प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शिवकला या प्रकारात या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक मिळवले.

या सर्व विद्यार्थ्यांची विभागायी स्पर्धेसाठी निवड  या स्पर्धेसाठी नवनाथ भिसे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. या वेळी क्रीडा शिक्षक अमर जाधव सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.