ग्रामीण भागातील रुचिता बोरकरने घेतली उच्च शिक्षणात भरारी

63

✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनीधी)

चिमूर(दि.2फेब्रुवारी):-तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सिरपूर येथील कुमारी रुचिता जगदीश बोरकर या युवतीने सायन्स गोडवांना विद्यापिठा मधील Bsc, Bio, Com ची परीक्षा उत्तीर्ण होहून आता ती Dmlt (पँथालाजी) कोर्स साठी गडचिरोली येथे शिक्षण घेत आहे तिच्या कुटुंबातील परिस्थिती हलाखीची होती तरी अशाही परिस्थितीत शिक्षण घेणे हे रुचिताला फार कठीण होते तरी पण परिश्रम करून पालकाने तिला शिक्षण दिले.

कुमारी रुचिताच्या जिद्द व चिकाटीने अफाट परीश्रमाच्या जोरावर तिने हे यश प्राप्त करीत ग्रामीण भागातील होतकरू युवक, युवती समोर आदर्श निर्माण केला.गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत पदवी पर्यंत शिक्षण घेतले नंतर ती Dmlt कोर्स करिता ती गडचिरोली येथे रवाना झाली कुमारी रुचिताला गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगेलं तिच्या या यशाबद्दल आई, वडील गुरुजन आणि सिरपूर वाशीय गावकऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव केले.