लॉयड्स कप इंडस्ट्रीयल क्रिकेट स्पर्धा

43

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.4फेब्रुवारी):-लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमी. कंपनीकडून नुकतेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पाच उद्योग समुहाच्या टिम सहभागी झाल्या होत्या. लॉयड्स कप इंडस्ट्रीयल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना लॉयड्स मेटल्स आणि चमन मेटॅलिक्स लिमी. या संघात झाला असून, चमन मेटॅलिक्सने विजयश्री मिळवून लॉयड्स कप आपल्या नावाने केला.पाच उद्योग समुहाचे संघ सहभागी झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अदानी-एसीसी सिमेंट लिमी. चे युनिट हेड के. आर. रे|ड्डी यांच्या हस्ते पार पडले होते.

जवळपास महिनाभर लॉयड्स ग्राम कॉलनीत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये लॉयड्स मेटल्स, अदानी-एसीसी सिमेंट, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, चमन मेटॅलिक्स व राजुरी स्टिल या उद्योगांच्या टिम सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या स्पर्धेतील अंतिम सामना लॉयड्स मेटल्स आणि चमन मेटॅलिक्स या संघामध्ये २९ जानेवारी रोजी पार पडला. अंतिम सामन्यात चमन मेटॅलिक्स संघाने ५ धावांनी विजय मिळवून लॉयड्स कपवर नाव कोरले. या स्पर्धेतील विजेत्या टिमला पोलीस उपअधिक्षक राधिका फडके यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यावेळी फडके यांनी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल लॉयड्स मेटल्स उद्योगाचे कौतुक केले. यावेळी लॉयड्स मेटल्सचे युनिट हेड संजय कुमार व इतर अधिकारी उपस्थित होते.