


✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 4 फेब्रुवारी):-येथील माहेश्वरी नाट्यगृह येथे आयोजित राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाची राज्यव्यापी परिवर्तन यात्रा कार्यक्रमातून प्रमुख वक्ते प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती मोर्चा श्रीकांत ओव्हळ यांनी बोलताना महाराष्ट्राचा ओबीसी समाज झोपला नसून झोपेचा सोंग घेत आहे असे प्रतिपादन केले.
ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पिछडा वर्ग परिर्वतन यात्रा मागील 21 जानेवारी रोजी नागपूर येथून सुरू झाली असून ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाजात जनजागृती करीत भ्रमण करणार आहे.
त्याच अनुषंगाने येथील स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृह येथे यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर अँड मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सभेचे उद्घाटन झाले.
सभेचे अध्यक्ष चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग नई दिल्ली उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब चंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष राजू भैय्या जयस्वाल, अँड. संतोष जैन, राजू खामणेकर, अरविंद ओझलवार, साहेबराव धात्रक, वर्षा देवसरकर, डॉ .आशिष उगले, अजय नरवाडे, राजू खामणेकर, शंकर जाधव यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांनी आपाले विचार व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी बोलताना 34 टक्के मराठा समाजाची संख्या असताना साडेतीन टक्के लोकांचा वर्चस्व महाराष्ट्रावर असल्याचे सांगितले.
केंद्रातील सरकारच्या खुर्च्या खाली कराव्या लागतील. सत्तेसाठी भक्त तयार करत असल्याचेही सांगितले.
तसेच बाळासाहेब चंद्र पाटील यांनीही 52 टक्के ओबीसी समाजावर अन्याय होतो व जातीय जनगणना झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.
वर्षा देवसरकर यांनी बोलताना ओबीसी समाजावर अन्याय होण्याचे कारण ओबीसी हा उठाव करीत नाही.तसेच कार्यक्रमाला चार चांद लावणारे श्रीकांतदादा ओव्हळ यांनी बोलताना ओबीसीचा फक्त वापर केला जातो धर्माचा रक्षण करताना ओबीसी चा वापर करण्यात येतो.
ओबीसी ने आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
तसेच भारतात ओबीसीचे 125 खासदार व 21 मंत्री असतानाही ओबीसी समाजाची जनगणना होत नाही ‘गाढवाची जनगणना होते, हिजड्याची जनगणना होते, कुत्र्याची जनगणना होते तर ओबीसीची जनगणना होत नाही ” असे बोलताना आयोजित कार्यक्रमात मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला त्याचबरोबर मराठा समाजातील आमदार खासदार ईडी लावण्याच्या धाकाने आरक्षणासंदर्भात बोलत नसण्याचे सांगितले ओबीसींच्या विविध मागण्यासह प्रदेश व्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन चौधरी विकास पटेल करीत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चक्रधर देवसरकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्वान केवटे यांनी केले.




