विभागीय क्रीडास्पर्धेत मरसुळ आश्रमशाळेचे सुयश

🔸खो-खो, रिले मुलींचे संघ राज्यस्तरावर

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागामार्फत अप्पर आयुक्त अदिवासी विकास अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा दि. 1 ते 3 फेब्रुवारी 2023 ला पुसद प्रकल्पाद्वारे फुलसिंग नाईक महाविद्यालयाचा क्रीडा संकुलात आयोजित केल्या होत्या.

या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित माहात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मरसुळ ता. पुसद जि. यवतमाळ या शाळेने विभागीय क्रीडा स्पर्धेत सुयश संपादन केले. 19 वर्षा आतील मुलींच्या संघा मध्ये कु.चंचल भिसे, अंजली पवार, मयुरी भिसे, मायावती राठोड, आरती भोगे, कोमल पवार, प्रगती घुक्से, दिव्या चव्हाण राणी कन्हेरे, रोशनी राठोड, तेजस्विनी पवार, पल्लवी शिकारे या मुलीनी अंतिम सामन्यात पुसद प्रकल्पाकडून खेळून धारणी प्रकल्पाच्या मुलींना मात देत राजस्तरीय खो-खो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.

आदिवासी विकास अमरावती विभागीय अप्पर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी या संघाचा ट्रॉफी देऊन सन्मान केला. या मुली अमरावती विभागाद्वारे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खेळणार आहेत.19 वर्षीय आतील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कु. दिव्या चव्हाण, चंचल भिसे यांची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड करण्यात आली. वैयक्तिक रिले स्पर्धेत 4X100 मध्ये कु. कोमल पवार व कु. दिव्या चव्हाण यांनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले. 4 x 100 मुलांच्या रिले स्पर्धेत कान्हा राठोड व प्रतिक भिसे यांनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्य स्तरीय स्पर्धे साठी आपले स्थान निश्चित केले. 200 मिटर रनिंग मध्ये कु. कोमल पवार हिची राज्य स्पर्धे करिता निवड करण्यात आली. एकूण 19 विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे करिता निवड करण्यात आली.

आश्रम शाळा सातत्याने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम गुणवत्ता पूर्ण शिक्षणासोबत उत्कृष्ठ निकाल क्रीडा स्पर्धेत भरीव कामगिरी करीत असल्यामुळे संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री अॅड. श्री. शिवाजीराव मोघे साहेब यांनी समाधान व्यक्त केले, व सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी ए.यु. धाबे साहेब यांनी विजयी संघाचे कौतुक व अभिनंदन केले, व राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविण्याच्या शुभेच्छा दिल्या. आश्रम शाळेने मिळविलेल्या या यशाने पालक वर्गामध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून या शाळेचे सर्व विद्यार्थी राज्यस्तरावर विजयी होतील. असा विश्वास व्यक्त करीत आहे.संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मोघे, सचिव ज्ञानेश्वर तडसे व शाळेचे युवा संचालक लिलाधर मळवणे, शाळेचे कुशल नेतृत्व करणारे प्राचार्य ए.जि. सय्यद, क्रीडा शिक्षक बी. एच. साबळे, जि.आर. ठाकूर व सर्व कर्मचारी वृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED