संस्कारमय समाज निर्मितीसाठी धम्म शिबिराची गरज-साहित्यिक तथा संविधान अभ्यासक प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे

29

🔸शियनपायली येथील दोन दिवसीय धम्म शिबिराचा समारोप

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4फेब्रुवारी):– सद्याच्या स्थितीत समाज दिशाहीन होत चालला आहे. अनिष्ट चालीरीती वाढीस लागल्या आहेत. समाज बुद्धाची शिकवण विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला संस्कारमय समाज निर्मितीसाठी धम्म परिषदाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे यांनी धम्म परिषद मध्ये व्यक्त केले.

मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभूमी स्मारक समिती शिवणपायली वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय धम्म परिषद नुकताच पार पडली.

दोन दिवसीय धम्म परिषद दोन सत्रात उत्साहात पार पडली. धम्म क्रांतीचे पाच सूत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समाज निर्मिती या विषयावर दुपारी मान्यवरांचे व्याख्याने झाली.

पहिल्या सत्रात धम्मधवजाचे धवजरोहन सामूहिक बुद्ध वंदना करून बौद्ध धम्म परिषदेला सुरवात करण्यात आली.उदघाटन बर्टीच्या समतादूत प्रज्ञाताई राजूरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी अध्यक्षस्थानी पी एम डांगे, तर मार्गदर्शक संविधान तथा अभ्यासक लेखक प्रेमकुमार खोब्रागडे, चंद्रमनी घोंनमोडे, जिंदा भगत, जी टी खोब्रागडे, पत्रकार विकास खोब्रागडे, सरपंच वैशाली निकोडे, नर्मदा रामटेके, पाटील रमेश राऊत, एकनाथ गोंगले, आवळे, वालदे, नागनाथ फुलझेले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जातिपातीच्या राजकारणात न गुंतता समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. समाजाची खुंटलेली प्रगती साधण्यासाठी समाजबांधवानी जातिपाती विसरत न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही उद्घाटन प्रसंगी समतादूत प्रज्ञाताई राजूरवाडे यांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित मान्यवर मार्गदर्शक यांनी सुद्धा संविधान आणि समाज आणि धम्म यावर मार्गदर्शन केले.सायंकाळी ९ वाजता नागपूर येथील सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचा फुले भीम-बुद्ध गीतांचा-कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

३ फेब्रुवारीला धम्म रॅली, शीलग्रहण, परित्रांण पाठ, भिक्कु संघाची धम्मदेशन व मंगलमैत्री पूज्य भदंत शिलांनद महास्थविर, पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थविर, संगारामगिरी व भिक्कुसंघाच्या, उपस्थितीत शिलग्रहन मंगल मैत्री धम्मदेशन देण्यात आली.या धम्म मेळावच्या संचालन बालकदास पाटील यांनी तर प्रास्ताविक जनार्धन डेकाटे यांनी तर आभार प्रफुल रामटेके मानले.धम्म परिषदिला परीसरातील शेकडो धम्म उपासक उपसिकांची उपस्थिती होती समितीने भोजनदान केले. आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी सदस्य, उद्धव डेकाटे, लक्ष्मण रामटेके, भाऊराव रामटेके, कवडुजी पाटील, प्रणय पाटील, सूरज रामटेके, गजनन भौसारे, सौरव रामटेके, सुरेश डेकाट, धनराज खोब्रागडे, गौतम गोंडाने, धम्मदिप रामटेके, अनुराग गोंगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील विविध मंडळानी सहकार्य केले