शिवाजी महाराज शेळके यांना आज अहमदनगर सिटी मध्ये सहज एकजण दारू पिऊन दुकानासमोर झोपलेला दिसला

28

✒️गेवराई प्रतिनिधी(गणेश भाऊ ढाकणे)मो:-8888435869

बीड(दि.5फेब्रुवारी):-बघा दारु पीनाराची परिस्थिती काय आहे. त्याचं कुटुंब त्याची मुलं नक्कीच आपला बाप घरी येताना खाऊ घेऊन घरी येईल याची वाट बघत असतील. काय करायचं त्याच्या बायकोने आणि मुलांनी कसं जीवन जगायचं याचा विचार करा. मी आईची शपथ घेऊन सांगतो मी एका दारुड्याचा मुलगा आहे जोपर्यंत मी या जगात जीवंत आहे तोपर्यंत मी फक्त दारूबंदी आणि व्यसनमु्तीसाठीच जगेन हे कार्य करताना कितीही मोठी संकटे आली तरी मागे सरणार नाही. लोकांनी कितीही त्रास दिला तर मरण पत्करेन पण व्यसनमुक्तीचे कार्य बंद करणार नाही.

कोणाच्या नजरेत मी धंदा करतो असं समजत असेल, कोणाच्या नजरेत काय मला माहित नाही पण या कार्यासाठी जीव द्यायची वेळ आली तरी मी घाबरणार नाही ज्याला दारू पासून मुक्त व्हायचे असेल त्याने ही पोस्ट वाचा व पुढे पाठवा. याच्यावर जर वाटलच वाईट तुम्हाला की माझ्या आई बहिणीचा संसार दारूतून बाहेर आला पाहिजे, नक्की खंबीरपणे पाठीशी उभे रहा नाही राहता आले तर हातात हात देऊन मला लढण्याची संधी द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असूद्या…

शिवाजी शेळके सांगतो तुमच्यासारख्या संत मायबापांना
मोबाईल नं:9356383655

पत्ता ज्ञानेश्वरी आद्यात्मिक अनाथ वारकरी शिक्षण संस्था महाराज या संस्थेत आज २८ मुले त्यातील काही मुले दारू पिनाऱ्यांची आहेत. व १५मुले एकही रुपया न घेता पायाच्या नखपासून डोक्याच्या केसापर्यंत पोटच्या मुलासारखे या अनाथांचा सांभाळ करतात आत्ता ही संस्था भाडोत्री जागेत आहे येत्या वर्षभरात स्वतंत्र जागेत ही संस्था व्हावी ही महाराजांची इच्छा आहे यासाठी इच्छुक लोकांना अनाथ मुलांच्या पालनपोषण करता व जागा घेण्याकरता जेवढी मदत करता येईल तेवढी मदत समाजाकडून व्हावी ही विनंती. या कार्याला अगदी ज्यांच्या जीवावर जगतो त्या ज्ञानोबरायांची शपथ घेऊन सांगतो मी मरेपर्यंत पोट भरण्यासाठी माझा हा बिझनेस नसेल हे आईची शपथ घेऊन सांगतो.मी जीवंत असेपर्यंत होता होईल एवढा समाज व्यसनातून बाहेर काढेन ही एक माझे वडील गेल्यापासून घेतलेली शपथ आहे

संस्थापक युवा कीर्तनकार शिवाजी महाराज शेळके
खंडोबा नगर बारामती
मोबाईल क्र: 9356383655
8550904814
टीप संस्थेमध्ये अनाथ मुलामुलींसाठी मोफत प्रवेश सुरु आहे

मुलांना शिकवले जाणारे विषय पखवाज, गायन, कीर्तन भारुड, बेंजो, तबला ढोलकी ढोलक पॅड परिपाठ, भगवदगीता ज्ञानेश्वरी, गाथे तील काही अभंगावर गोड चिंतन

आपला स्टेटस आपली शेअर करण्याची पध्दत यांच्यावरून तुमचे प्रेम मला समजेल
राम कृष्ण हरी