शिक्षणविभागाच्या दुर्लक्ष पणामुळे शिक्षक मारतात शाळेला दांडी

39

🔹दांडी बाज गुरुजी वर होणार कारवाई

🔸चक्क विद्यार्थ्यांनी केला शिक्षकाच्या विरोधात आंदोलन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.8फेब्रुवारी):- तालुक्यापासून सात किलमीटरवर असलेल्या जिल्हा परिषद पाटागुडा शाळेत शिक्षकांनी गोंधळ मांडला आहे.कधी शिक्षक सुट्टीवर तर कधी अवेळी येतात.त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून चक्क विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरून रस्ता जाम आंदोलन केले.ही बातमी व्हॉट्सॲप च्या माध्यमातून वायरल झाली शाळेतील प्रकार पाहता या विद्यार्थ्यांची कीव येते. रजा मंजूर नसतांना देखील शिक्षक सुट्टीवर जातात ही प्रशासनाची कमजोरी लक्षात येते.प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडावा येथील पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली.

त्यावेळी सहाय्यक उप निरीक्षक रवींद्र म्हैसेकर हे आपल्या ताफ्यासह शाळेत पोचले त्यांनी विद्यार्थ्याच्या समस्या ऐकून घेतल्या.विद्यार्थी सांगत होते की शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले की सहा महिन्यापासून तालुक्याला पत्र व्यवहार सुरू आहे पण कोणी लक्ष देत नाही आहे.यावेळी केंद्र प्रमुख बावणे यांनी सांगितले की तालुक्यात अठहावन शिक्षकांची पदे कमी आहेत त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली असून यावर चार दिवसात शिक्षक देऊन समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिले.विद्यार्थी सांगत होते की आम्ही यंदा क्रीडा स्पर्धांचे तयारी केली पण आम्हाला कोठेच क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. बानकर व कोयलवार हे मनमानी सुटीवर राहतात.या शिक्षकांना नेमक बळ कुणाचं आहे असा प्रश्न गावकरी विचारणा करीत होते.शेवटी विद्यार्थी पंचायत समितीच्या दिशेने पायी प्रवास करीत निघाले.

विद्यार्थी सांगत होते की आम्ही चक्क शिक्षण अधिकारी यांचे दालनात जाऊन बैठक करणार आहोत.आणि ते गावातून एक ते दीड किलोमीटर अंतर कापले होते. त्यावेळी दुपारचे जेवण नाही भर उन्हात त्यांना हे चटके सहन होत नव्हते म्हणून गावातील पोलिस पाटील व पोलिस प्रशासन आणि केंद्र प्रमुख यांनी समजावून त्यांना शाळेत घेऊन गेले. सदर प्रकरणावर वरिष्ठांनी लक्ष देऊन त्या शाळेतील दांडी मारू शिक्षकांना निलंबित करून विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावावेत असे ग्रामस्थ अशोक गायकवाड यांनी केंद्रप्रमुख यांचे जवळ मागणी केली.