प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी येथे रक्तदान शिबिर संपन्न

26

🔹प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी येथे रक्तदान शिबिर संपन्न

🔸रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान- संजय गजपुरे

✒️इरव्हा(टेकरी)संजय बागडे(मो:-९६८९८६५९५४)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य
प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . या प्रसंगी उपस्थित माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी दीप प्रज्वलन व माता सवित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले . अध्यक्षस्थानी मौशीचे सरपंच लोखंडे होते .

रक्तदान हे जीवनातील सर्वश्रेष्ठ दान असुन यामुळे एखाद्या गरजुला जीवनदान मिळु शकते असे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले. हत्तीरोग निर्मुलनासाठी नागभीड तालुक्यात उत्तम काम केल्याबद्दल आरोग्य विभागाचे याप्रसंगी संजय गजपुरे यांनी कौतुक करीत अभिनंदन केले. नागपूरच्या लाईफ लाईन ब्लड बॅंकेच्या चमूने या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.याप्रसंगी माजी सरपंच वामन तलमले, अरुण मानापुरे, मौशी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी रामटेके मॅडम, डॉ.सागर माकडे , आरोग्य सहाय्यक रावेकर , आरोग्य सहाय्यक पारधी,आरोग्य सहाय्यिका रामटेके सिस्टर,भानारे सिस्टर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य
प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . या प्रसंगी उपस्थित माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी दीप प्रज्वलन व माता सवित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले . अध्यक्षस्थानी मौशीचे सरपंच लोखंडे होते .

रक्तदान हे जीवनातील सर्वश्रेष्ठ दान असुन यामुळे एखाद्या गरजुला जीवनदान मिळु शकते असे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले. हत्तीरोग निर्मुलनासाठी नागभीड तालुक्यात उत्तम काम केल्याबद्दल आरोग्य विभागाचे याप्रसंगी संजय गजपुरे यांनी कौतुक करीत अभिनंदन केले. नागपूरच्या लाईफ लाईन ब्लड बॅंकेच्या चमूने या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.

याप्रसंगी माजी सरपंच वामन तलमले, अरुण मानापुरे, मौशी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी रामटेके मॅडम, डॉ.सागर माकडे , आरोग्य सहाय्यक रावेकर , आरोग्य सहाय्यक पारधी,आरोग्य सहाय्यिका रामटेके सिस्टर,भानारे सिस्टर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.