जिल्हा न्यायालयात आर्सेनिक अल्बम औषध वितरण

13

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16जुलै): जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती संवर्धक औषधाचे वितरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी संपन्न झाले.

कोविड 19 संकमणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती संवर्धक औषधाचे वितरण शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांना या औषधाचे वितरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या शुभहस्ते झाला. या प्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात कार्यालय प्रमुखांना सदर औषधाचे वितरण करण्यात आले.त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना सुध्दा औषध देण्यात आले. सदर औषध घेण्याची पद्धत, डोस, वेळ, पथ्य याबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त सविस्तर माहितीपत्रक सुद्धा सर्वांना देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे.सोशल डिस्टन्सिंग पाडावे व सदर औषधाचे सूचनेप्रमाणे सेवन करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले आहे.