जि.प. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून चोरी

48

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.११फेब्रुवारी):-सीसीटीव्ही बसवण्याचे मुख्य कारण चोरांपासून संरक्षण व्हावे मात्र उमापूरच्या जिल्हा परिषद शाळा परिसरात चार दिवसापूर्वीच बसवलेले सीसीटीव्हीच्या दोन कॅमेऱ्याची चक्क चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही शाळेतून एलसीडी टीव्ही चोरी गेल्याचा प्रकार घडूनही व्यवस्थापनाकडून कसलीही प्रकारची पोलीस कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गत अनेक दिवसापासून उमापूरच्या जिल्हा परिषद शाळा परिसरात माथेफिरूकडून इमारतीचे नुकसान करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती.

उमापूर जि.प. शाळेतील प्रकार- दरवाजा, फळा, खिडक्या तसेच नळाच्या तुट्या तोडण्याचा प्रकार होत होते. ग्रामपंचायत च्या वतीने चार दिवसापूर्वी वित्त आयोगातून सीसीटीव्ही बसवण्यात आले मात्र विजेची समस्या असल्याने चालू करण्यात आले नव्हते, याचाच फायदा माथेफिरूने घेतला (गुरुवार दि,०९ फेब्रुवारी) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कॅमेराची तोडफोड करून चोरून नेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
————–
व्यवस्थापनाची बघ्याची भूमिका : जिल्हा परिषद शाळेत या अगोदर ही एलसीडी टीव्ही ची चोरी झाली होती नेहमीच शाळा परिसरात माथेफिरू कडून अनेक प्रकार घडले आहे व्यवस्थापन समिती दरवेळी बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे