स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे अर्ज पोस्टाने अथवा मेलद्वारे सादर करावे

24

🔺लॉकडाऊन दरम्यान कोणीही कार्यालयास भेट देऊ नये

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16जुलै):-आदिवासी उमेदवारांकरीता विविध पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करून घेण्याकरिता प्रशिक्षण 1 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आले आहे. आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने किंवा chandrapurtribalrojgar@gmail.com या मेलव्दारे सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

दिनांक 1 ऑगष्ट 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत साडे तिन महिणे कालावधीचे प्रशिक्षण दिनांक 1 ऑगष्ट 2020 पासून ऑनलाईन,ऑफलाईन पध्दतीने सुरु होणार आहे.यादृष्टीने यापूर्वी आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 27 जुलै 2020 पर्यत पोस्टाव्दारे,मेलव्दारे किंवा स्वतःही कोरोना या संसंर्गजन्य महामारीची काळजी घेऊन कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले होते. परंतू दि.17 जुलै ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन असल्याने यादरम्यान,कोणीही कार्यालयात स्वतः येऊ नये.कृपया याबाबत नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी 07172-270933 या दुरध्वनीवर संपर्क करावा, असे कार्यालयाच्या केंद्रप्रमुख भाग्यश्री वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितली आहे.