टोकाची भूमिका न घेता पक्षकारांनी आपसांत सामंज्यसाने वाद मिटवले तर समाधान मिळेल- न्यायाधीश सु.ना.राजुरकर

25

✒️मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर प्रतिनिधि)

राजगुरूनगर(दि.14फेब्रुवारी):-विधी सेवा प्राधिकरण व राजगुरुनगर बार असोसिएशन यांच्या वतीने राजगुरुनगर व जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी सामंज्यसाने व सुसंवादाने तडजोड करून वाद मिटवावे, असे आवाहन राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सु. ना. राजुरकर यांनी केले. या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजुरकर साहेब यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाचे सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर साहेब, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पाखले मॅडम, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश महेंद्र पाटील साहेब, तालुका न्यायाधीश आर. डी. पतंगे/इंगळे मॅडम, तालुका न्यायाधीश डी.बी. पतंगे साहेब, तालुका न्यायाधीश जे. व्ही. म्हस्के मॅडम, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथजी गावडे साहेब, माजी अध्यक्ष ॲड अरुण मुळूक, ॲड पोपटराव तांबे पाटील, ॲड माणिकराव पाटोळे, ॲड देविदास शिंदे पाटील, उपाध्यक्ष ॲड ललित नवले, सचिव ॲड गोपाळ शिंदे, ॲड संदीप दरेकर, ॲड रेश्मा भोर, ॲड रश्मी वाघोले, ॲड अतुल गोरडे, ॲड नामदेव वाडेकर, ॲड दत्तात्रय लिंभोरे, ॲड सुलभा कोटबागी, ॲड महेश कोहिनकर, ॲड निलेश चौधरी, ॲड आरती टाकळकर, ॲड वैभव कर्वे, ॲड प्रतिभा होले यांच्यासह वकील, खेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, खेड तालुका गटविकास अधिकारी, पक्षकार उपस्थित होते.

युनियन बँकेच्या डी जी एम शारदा मूर्ती, न्यायालयीन कर्मचारी व बँकांचे कर्मचारी उपस्थित होते. पॅनल सदस्य म्हणून ॲड अजय टाकळकर, ॲड लहू तरडे, ॲड सोनाली कोकणे, ॲड आरती सांडभोर यांनी काम पाहिले.

9 कोटी 52 लाख 6 हजार 929 रुपये व 2 कोटी 76 लाख 83 हजार 84 रुपयांची सेटलमेंट तडजोडीने झाली. तडजोडी करिता एकूण 2543 दिवाणी दावे व खटले ठेवण्यात आलेले होते. त्यापैकी 203 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. प्रिलिटिगेशनची 10776 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 3946 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारचे अध्यक्ष नवनाथ गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड अबू बकर पठाण यांनी केले व आभार ॲड प्रवीण पडवळ यांनी मांडले.