आंबोली येथील वारजूकर कनिष्ठ महाविद्यालयाचा ८८.६३ टक्के बारावीचा निकाल

38

🔹महाविद्यालयातून कु. निकिता पोटे प्रथम

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर (१६ जुलै) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात चिमूर तालुक्यातील श्री राजाराम पाटील वारजूकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.६३ टक्के लागला असून महाविद्यालायातुन कु. निकिता पोटे हिने ७७.०७ टक्के गुण मिळवून प्रथम आली.

     श्री राजाराम पाटील वारजूकर कनिष्ठ महाविद्यालय गेल्या चार वर्षापासून केंद्रात सर्वात जास्त निकाल देणारे महाविद्यालय ठरले. या महाविद्यालातुन ४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाली होती. त्यापैकी ३९ विद्यार्थी पास झालेत. यामध्ये प्रथम श्रेणीत १२, द्वितीय श्रेणीत २६ तर तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी पास झालेत.

     यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा संस्थेचे सचिव माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर व पदाधिकारी, महाविद्यालाचे प्राचार्य पिल्लेवान, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.