ATM कार्डची अफरातफर करून फसवणूक करणारे आंतरराज्य टोळी ब्रम्हपुरी पोलीसांच्या ताब्यात

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 14 फेब्रुवारी):-विविध बँकाकडून जनतेच्या सोईसाठी उपलब्ध होणारे ATM कार्ड द्वारे फसवणूक करून त्यांच्या कष्टाचे पैसे दुसऱ्या ATM मशीनमधून काढून लुबाडणूक करणारी हरीयाणा राज्याची टोळी ब्रम्हपुरी पोलीसांच्या हाती लागून एक रॅकेट उघड झाले आहे. गुन्हयातील आरोपीतांनी टोळी वेगवेगळ्या राज्यात फिरुन एटीएममध्ये गर्दी पाहुन ज्यांना ATM कार्ड वापरता येत नाही त्यांना हेरून पैसे काढण्याकरीता मदत करण्याचे बहाण्याने त्यांचे एमटीएम कार्ड ची अदलाबदली करून दुसरे एटीएम कार्ड देवून वेगवेगळया एटीएममधून पैसे काढुन फसवणुक करीत होते.

दि. 25/11/2022 रोजी ब्रम्हपुरी येथील SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यास गेलेले माजी सैनीक नामे वामन गोसाई दिघोरे रा. किन्ही ता. ब्रम्हपुरी याना अज्ञात आरोपीने पैसे काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे ATM कार्ड बदलुन दुसरे कार्ड दिले. त्याना त्यावेळी सदर फसवणूक लक्षात आली नाही. तीन दिवसांनी परत ATM मध्ये जावुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा माहीत झाले की, आपली फसवणुक झाली आहे. त्यांनी बँकेत जावुन स्टेटमेंट काढले असता 10,000 रु वडसा येथील ATM मधुन विड्रॉल झाल्याचे समजले तसेच 74,997 रुपये ऑनलाईन ट्राझेक्शन झालेले दिसले असे एकुण 84.997 रुपये थी फसवणुक झालेली असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध तकार दिल्याने अप.क्र. 587/2022 कलम 420 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचे तपासादरम्यान सीसीटिव्ही फुटेज व विविध तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपी हे मौजा हंसी जि. हिसार राज्य हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून ते वापरत असलेले वाहन हरीयाणा पासींग आहे याची खात्री पटली. त्याआधारे आरोपींचा शोध सूरू झाला. सदर ठिकाणी दि. 07/11/2022 ला पथक पाठविले असता आरोपी हे त्या ठिकाणावरुन पसार झाले होते.

दि. 11/02/2023 रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि गुन्हयातील आरोपी हे आदिलाबाद कडे अश्याप्रकारचा गुन्हा करण्यासाठी निघाले असल्याने तात्काळ पोलीस पथक गठीत करुन जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगाना कडे रवाना केले. पथकाला पुन्हा माहिती मिळाली की, आरोपी हे टाटा नेक्सन कार क. एच आर 21 पी 0125 ने आदिलाबाद करुन नागपुर कडे जात आहे. तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करीत असताना आरोपी हे चारचाकी वाहनाने समोर असल्याने पोस्टे बुटीबोरी नागपुर ग्रामीण पोलीसांना कळवून त्याचे सहकार्याने कार थांबवुन कारमधुन तीन इसमास ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे जोगीदरसिंह चंदरसिंह बिटटु वय 26 वर्ष रा. पुठठी सामान ता.नारनोंद जि. हिसार राज्य हरीयाणा, राजेश रेलुराम माला वय 45 वर्ष रा. हंसी जि. हिसार राज्य हरीयाणा , पुनीत शिवदत्त पांचाल, वय 32 वर्ष रा. बुडाबाबा वस्ती जिंद ता. जि. जिंद राज्य हरीयाणा यांच्या ताब्यातुन 72 ATM कार्ड, 43.000रु. रोख रक्कम, तीन मोबाईल, गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली Tata nexon car no. HR 21 P-0125 वाहन जप्त करण्यात आले. सदर आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेले ATM कार्ड हे विविध राज्यातील व्यक्तीचे असल्याने आरोपी हे राजस्थान, गुजरात, तेलगांना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यामध्ये ए टी एम ची अदलाबदल करून नागरिकांची फसवणुक करीत असल्याचा दाट संशय आहे. सदर आरोपी सध्या पोलीसांच्या अटकेत आहेत.

सदरची कार्यवाही मा. रविंद्रसिंह परदेशी सा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर व मा. श्रीमती रिना जनबंधु मॅडम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या सुचनेप्रमाणे श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी व पो. नि. रोशन यादव सा. पो स्टे ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, नापो / 2552 मुकेश गजबे, नितीन भगत / 2379, योगेश शिवणकर / 1734, पोशी / 2332 संदेश देवगडे, विजय मैद / 163 अजय कटाईत / 2522 यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पूढील तपास सपोनी प्रशांत ठवरे करीत आहेत. तरी नागरीकाना आवाहन करण्यात येते कि, आपल्यासोबत अशा प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सदर घटना आपल्यासोबत झालेली असल्यास पो. स्टे. ब्रम्हपूरी येथे संपर्क साधावे असे ब्रम्हपुरी पो. स्टे. कडून कळविण्यात येत आहे.