१५ फेब्रुवारी महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त” खुल्या सामाजिक परिवर्तन काव्यमैफल “चे आयोजन

28

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.14फेब्रुवारी):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या १५ फेब्रुवारी जयंतीनिमित्त विशेष काव्यमैफलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सामाजिक परिवर्तन काव्यमैफलमध्ये सर्वांना खुला,मुक्तप्रवेश आहे. या काव्यमैफलमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या कवितांचा समावेश असलेली कविता सादर कराव्या.असे आवाहान करण्यात येत आहे. तेव्हा सर्व कवी कवयिञींनी वेळवर हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*या काव्यमैफल कार्यक्रम वेळ दुपारी १२.३०ते ३ असा असेल.*

या कार्यक्रमाचे अध्यक्षसुखदेव तात्या सोनवणे (महाराष्ट प्रदेशाध्यक्ष-दलित पॅंथर) राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ढसाळ (ज्येष्ठ पञकार व संपादक,पिंपरी-चिंचवड) यांना निमंत्रित केले आहे.

यावेळी सर्व सहभागींना पदमश्री महाकवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त उत्तम काव्यसादर केल्याबद्दल कवी कवयिञींचा सन्मान करुन गौरविण्यात येणार आहे.

*तसेच दुपारी ३ ते ४ या वेळेत “संपुर्ण भारतातील पर्यटन”* विषयी माहिती व पर्यटनाच्या विविध ठिकाणी जाणा-या स्थळांची माहितीचे मार्गदर्शन *पर्यटन तज्ञ अरुण थोरात* यांचे मिळणार आहे.तरी भारतभर पर्यटनाला जाऊ इच्छिणा-या पर्यटकांसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे.विशेष मार्गदर्शन हे विनामूल्य आहे. तरी वेळेवर हजर उपस्थित राहून पर्यटनाबाबत माहीती घ्यावी.

*सामाजिक परिवर्तन काव्यमैफल हा कार्यक्रम पैस रंगमंच, थिएटर वर्कशाॅप कंपनी, प्रीमीयर प्लाझा- २, तिसरा मजला, हस्तकला वस्ञदालनाच्या वर, पुणे मुंबई रस्ता,चिंचवड,पुणे१९ येथे होणार आहे*

 

*या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कवी वादळकार,पुणे,प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे (संस्थापक राष्टीय अध्यक्ष, नक्षञाचं देणं काव्यमंच) यांनी केले आहे*
संपर्क -९६५७३४८६२२