मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

28

🔹श्रीमद् संगीत भागवत ; श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०५पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले)

पुसद(दि.15फेब्रुवारी):-श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत श्री. समर्थ नागोजी महाराज परिसरात करण्यात आले होते.

भागवताचार्य संतोष महाराज ठाकरे(रा.आसरा पार्डी जि.वाशिम)यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन केले.गुरूवारी (ता.७) ह.भ.प. भास्कर महाराज खडकदरी, ह.भ.प.रंगनाथ मुरूंबेकर,(ता.८)ह.भ.प.प्रभुजी महाराज गोभणे वाशीम ,(ता.९)ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील वापुळकर मलकापूर शिवचरित्रकार ,(ता.१०) सकाळी ७ वाजता श्रीकृष्ण मुर्तीची नगर प्रदक्षणा होईल व ११वाजता होम हवन दिनकर गुरु (वाकोडीकर) जोशी गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले. व सायंकाळी महाप्रसादाचे सौजन्य कृष्णा आबाळे श्रीचे पुजारी व गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले.

त्यानंतर ह.भ.प.सुनिल महाराज पाटील घायाळ स्वरमुर्ती,(ता.११)ह.भ.प.अजय महाराज महाजन (दादा)अनसिंगकर ता.वाशीम,(ता.१२)ह.भ.प.अंजलीताई केंद्रे उदगीरकर जि.लातुर भागवतकथा तथा रामायणाचार्य स्वराल,(ता.१३)ह.भ.प.इंद्रजित महाराज रसाळ बीड सौजन्य श्री समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवा,(ता.१४)ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे मलकापूर,मंगळवारी १ वाजता ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे यांचे काल्याचे किर्तन झाले त्यानंतर सप्ताहात कार्य करणाऱ्या तसेच निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .

(ता.१३) सायंकाळी श्री .समर्थ नागोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त श्री .समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवा या संघटनेमार्फत पुसद ते मांडवा मोफत सेवा देण्यात आली होती.दि.१४ फेब्रुवारी रोजी यात्रेत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.