बुध्दांच्या म्हणण्यानुसार या जगात चार प्रकारचे लोक असतात!

29

) अंधारातुन अंधाराकडे जाणारे, 2) अंधारातून प्रकाशाकडे जाणारे, 3)प्रकाशकडून अंधाराकडे जाणारे, 4)प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारे…

१) अंधारातून अंधारकडे जाणारे
अशा व्यक्ती ज्यांच्या जीवनात अंधकार आणि फक्त अंधकारच आहे.म्हणजे त्याच्या जीवनात गरीबी आहे,चिंताआहे,व्याकुळता आहे,सर्वत्र परेशानी आहे.म्हणुन अशा व्यक्तीमध्ये क्रोध आणि द्वेष उत्पन्न होत असतो.आणि ती व्यक्ती त्याच्या दु:खाचा दोष नेहेमीच दुस-याला देतअसतो. मनातल्या मनात दुस-याला जबाबदार धरत असतो,नेहेमीच दुस-याला शिव्या देत असतो व दु:खाला विसरण्यासाठी सतत नशापान करतो.असा व्यक्ती आज म्हणजे वर्तमानात तर दु:खी असतोच भविष्यासाठी दु:खाचे बीज पेरत असतो म्हणजेच अंधारातुन अंधाराकडे तो जात असतो.

२ ) अंधारातुन प्रकाशाकडे.

अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अंधार आहे परंतु मनात प्रज्ञा जागृत होत आहे.तो असा विचार करतो की,हे जे काही माझ्या बरोबर होत आहे हे माझ्या दुष्कर्मामुळे होत आहे,मग मी दुस-याला दोष का देऊ? ते तर माध्यम असतात.जो आपले स्वत:चे सद्यस्थितीतील कर्म सुधारतो आणि ईतरांच्या प्रति मैत्री,करूणा व सदभावना ठेवतो.ईतरांच्या बाबतीत मनात काही ठेवत नाही जसे द्वेष किंवा राग.तर अशा व्यक्तीसाठी त्याचे जीवन सदैव प्रकाशमान राहाते.त्याची वाटचाल अंधारातुन प्रकाशाकडे होत असते.

३) प्रकाशाकडून अंधाराकडे.
अशी व्यक्ती ज्याच्याकडे भरपुर धन दौलत आहे,प्रतिष्ठा आहे,पण अहंकार आहे, सगळ्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो,दुस-याला कमी समजतो,दुस-याचा तिरस्कार करतो,नेहेमीच बघा मी किती बुध्दिमान आहे,किती मेहनती आहे? अस स्वत:बद्दल मानत असतो.असा व्यक्ती दु:खाचे बीज पेरत असतो अशा व्यक्तीच्या जीवनात भविष्यात पुढ जाऊन अंधारच होतो. त्याची वाटचाल प्रकाशाकडून अंधाराकडे होते.

४ ) प्रकाशातुन प्रकाशाकडे.
असा व्यक्ती नेहेमी प्रकाशात असतो त्याच्याबरोबर नेहमी प्रज्ञा जागृत असते,तो विचार करत असतो मी नेहेमी पुण्यकर्म करेन,लोकांची ऊत्तम सेवा करेन,स्वत:च्या सामर्थ्यानुसार लोकांना आनंद देत राहीन,ईतरांच्या प्रति नेहेमीच मंगल कामना करेन,तेव्हा अशा व्यक्तीच्या पुढील जीवनात फक्त प्रकाशच असतो. त्याची वाटचाल प्रकाशातुन प्रकाशाकडे होते.

✒️भंते शाक्यपुत्र राहुल(अकोला)मो:-९८३४०५०६०३