वंचित जनसंपर्क कार्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16फेब्रुवारी):-बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती पुसद येथील बस स्थानकाशेजारील कॉम्प्लेक्स येथे साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात मागील कित्येक दिवसापासून या ठिकाणी पक्षाच्यावतीने गोरगरीब निराधार वंचित श्रमिक कामगारांच्या मुलांसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्या माध्यमातून या मुलांना मोफत शिकवणी देण्यात येते. याच शिकवणी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विज्ञानवादी विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उपस्थित प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव सोशल मीडियाचे अशोक दामोदर, विश्वनाथ बर्डे, प्रवीण दामोदर, संजय जगताप सर, प्रणिता नाईक मॅडम इत्यादीच्या प्रमुख उपस्थितीत थोर मानवतावादी मूल्याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
या कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवृंद प्रणिता नाईक मॅडम, संजय जगताप सर प्रामुख्याने उपस्थित होते.