भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

28

नितीन रामटेके(गोंडपिपरी विशेष प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपीपरी(17जुलै):-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर बोर्ड फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर चा उत्कृष्ट निकाल लागलेला असून यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 100% तर कला शाखेचा निकाल 92.80% आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 96.42 टक्के लागलेला असून विज्ञान शाखेतून गौरव केशव बोपचे ह्याला 91.07% गुण घेऊन तो प्रथम कुलदीप हरी रामटेके 89.07% द्वितीय, कु संस्कृती राकेश वरगंणटीवार 88.76% तृतीय आले आहे. कला शाखेत मनोज नथुजी बावणे 90.61% टक्के गुण मिळाले असून प्रथम तर अमर हरिश्‍चंद्र कुंडगीर 89.53% द्वितीय, कु स्नेहा ओमप्रकाश नन्नावरे 87.84% घेऊन तृतीय व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतून
कु ज्योती शिवकुमार कोरे 82.46%
कु सलोनी प्रशांत बोदेले 77.85% कु रश्मी दिलीप मेश्राम 72.46% अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.. निकालात विशेष बाब म्हणजे विज्ञान शाखेतील गणित विषयात गौरव केशव बोपचे, कु संस्कृती राकेश वरगंणटीवार, कु तेजस्विनी सुनील खंडाळकर या विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण तर कला शाखेत राज्यशास्त्र विषयात मनोज नथुजी बावणे या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 गुण मिळाले आहे शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे भारतीय ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चूनिलालभाई चव्हाण, कार्याध्यक्ष रमनिक भाई चव्हाण, उपाध्यक्ष एड. वामनराव लोहे, सचिव केशवराव जेनेकर, सहसचिव लक्ष्मणराव धोबे, प्राचार्य राजू बनकर, उपप्राचार्य तन्निरवार सर, पर्यवेक्षक सी.बी. टोंगे, श्रीमती सहारे मॅडम, श्रीमती राऊत मॅडम,अवधूत कोटेवार आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..