पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक पदावर शरद कडू मराठे यांची नियुक्ती

14

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे काम वाढविण्यासाठी उत्तम कामगिरी करणारे शरद कडू मराठे यांचा कामाची दखल घेऊन त्यांची पत्रकार संघाचे राज्य संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद मराठे हे उत्तम वक्ता,दूरदृष्टी,अभ्यासू वृत्ती सोबत महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ नावारुपाला आणण्याची धमक पाहून त्यांची संघांच्या महाराष्ट्र राज्य संघटन पदावर निवड करण्यात आलीआहे.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, शिवधर्म व संघासाठी शरद मराठे आपले योगदान महत्वाचे आहे,हे कधी ही विसरता येणार नाही.आपण संघांचा विस्तार वाढविण्यासाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पूर्ण करणार याची खात्री आहे. संघाला नवे रंग-रूप देवून आपण संघाला एक उंचीवर नेऊन ठेवणार,यात तिळमात्र शंका नाही.आपली निवङ सार्थ ठरावी असे नमुद आहे त्यांचा नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.