ग्रामपंचायत प्रशासक म्हणून पोलिस पाटील यांना प्राधान्य द्या-राहुल उके पाटील

14

🔸पोलिस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष अमरावती यांची मागणी

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.17जुलै):; जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमतांना पोलिस पाटील यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी पोलिस पाटील संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील यांनी शासनास केली आहे.
कोरोणा आपत्तीमुळे राज्य शासनाने मुदत संपत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
राजकीय पदाधिकारी यांची नियुक्ती केली तर ग्रामविकासात अडथळा निर्माण होऊ शकतो.प्रशासक काळात काम करतांना राजकीय पदाधिकारी यांची नियुक्ती झाल्यास त्यास गावातुन विरोध होऊ शकतो. हा नको, तो नको यातुन गावाय तंटे, वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवाय कोरोणा जनजागृती समितीत शासनाने नेमुन दिलेले कामात विशेषतः पोलिस पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
टाळेबंदी काळात ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून चांगला समन्वय ठेवला आहे व कोरोणाचे संकटं कायम असल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी पोलिस पाटलांची नियुक्ती झाल्यास पारदर्शक पणे कारभार होऊ शकतो. शिवाय ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम अत्यंत प्रभावी पणे होऊ शकते. त्यामुळे पोलिस पाटील यांना प्रशासक म्हणून प्राधान्यक्रम देण्यात यावा असे निवेदन शासनास पोलिस पाटील संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील यांनी दिले आहे.