आज वडसी येथे ‘अतॄप्त मी तुझ्याविणा, या नाट्या प्रयोगांचे आयोजन

32

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24फेब्रुवारी):- चिमूर तालुक्यातील वडसी येथे खास बैलाच्या जंगी शंकर पटानिमीत्य खास लोकाग्रहास्तव युवराज प्रधान लिखीत संगीत अतृप्त मी तुझ्या विना या नाट्यप्रयोगाचे आयोजन २४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला करण्यात आले आहे.

सार्वजनिक नाटय कला मंडळ वडसी (खातोडा ) याचे सौजन्याने युवा रंगमंच वडसा प्रस्तुत संगीत अतृप्त मी तुझ्या विना या नाट्य प्रयोगांचे आयोजन सार्वजनिक व्यासपीठाच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे तरी नाट्य रसिकांनी नाट्य प्रयोगांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक नाट्य कला मंडळ वडसी यांनी केले आहे.