जय भवानी कारखान्याचे ऊस वजन काटे अचूक

30

🔹वैधमापन शास्त्र विभागाच्या पथकाने केली तपासणी

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.26फेब्रुवारी);-बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशाने वैधमापन शास्त्र विभागाच्या वजन मापे निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. २४ फेब्रु रोजी दुपारी भरारी पथकाने अचानक जय भवानी सहकारी साखर कारखाना येथे ऊस वजन काट्यांची तपासणी केली. जय भवानी कारखान्याचे ऊस वजन काटे अचूक असल्याचा निर्वाळा देत वजन काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र यावेळी भरारी पथकाने दिले. ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास हीच जय भवानी व शिवछत्र परिवारासाठी मोठी प्रेरणा असल्याचे कारखान्याची प्रतिक्रिया चेअरमन अमरसिंह पंडित यांनी यावेळी दिली.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशाने वैधमापन शास्त्र विभागाच्या वजन मापे निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या वजन कट्यांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणी पथकात बीडचे उपनियंत्रक जी.एम. कांबळे, वैधमापन शास्त्र निरीक्षक एस. ए. दराडे, गेवराई वैधमापन शास्त्र निरीक्षक के.ए. दराडे, परळीचे वैधमापन निरीक्षक वनवे, वैधमापन निरीक्षक अमूल ढवळे यांचा समावेश होता. पथकातील प्रतिनिधींनी उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असले बाबत फिरत्या वाहनांद्वारे कसून तपासणी करून पडताळणी केली. यावेळी जय भवानी चे सर्व ऊस वजन काटे अचूक असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पडताळणी प्रमाणपत्र कारखान्याला दिले.

ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास हीच जय भवानी व शिवछत्र परिवारासाठी मोठी प्रेरणा असल्याचे कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले. जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच चालवले जाते, असेही त्यांनी सांगितले.माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित व माजी चेअरमन जयसिंग पंडित यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालवले जाते, असे कारखान्याचे व्हॉईस चेअरमन जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, मुख्य शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, चीफ इंजिनिअर अशोक होके, प्रोडक्शन मॅनेजर गजानन वाळके, डेप्युटी चीफ इंजिनिअर ऋषिकेश देशमुख, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, कामगार कल्याण अधिकारी संदीप भोसले, परचेस अधिकारी सुशांत साळुंके, डिस्टीलरी इन्चार्ज राजेंद्र बढे, केनयार्ड सुपरवायजर भागवत घोलप, ज्ञानेश्वर जामकर, ईपीडी मॅनेजर धनाजी भोसले, यांच्यासह सर्व खाते प्रमुख, कर्मचारी तसेच नारायण कारंडे, गोवर्धन शिंदे हे ऊस उत्पादक सभासद यावेळी उपस्थित होते.