दुसऱ्याला जातीवादी म्हणणाऱ्यानो, स्वतः आत्मपरीक्षण करा..!!…. आपण पोटजातीच्या बाहेर निघालो का ?

30

🔹दादासाहेब शेळके(राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28फेब्रुवारी):-जो जातीवादी तो जातीवादी म्हणणारे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते धम्म परिषदेचे आयोजक धम्म प्रचारक यांनीच पोटजात सुरक्षित ठेवून सोन्या सारख्या धम्माची वाट लावली व त्याच वाटेने बौद्ध समाज जात असून हे कुठेतरी थांबले पाहिजे असे प्रतिपादन भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी येलकी फाटा ता.कळमनुरी जि. हिंगोली येथे आयोजित 19 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदे च्या अध्यक्षपदावरून प्रमुख व्यक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.

यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद गायकवाड वंचीत बहुजन आघाडीचे चे प्रशांत इंगोले भीम टायगर सेनेचे पंजाब कांबळे राष्ट्रपाल सावतकर मुन्ना वाटोरे राहुल सोनकांबळे माधव डोंगरे प्रतीक कदम भिमराव हनवते पंकज वाठोरे सम्राट गायकवाड गजानन वैद्य विलास जोंधळे ज्योतिबा पाईकराव सुनील पाईकराव रिपब्लिकन सेनेचे संदीप मांजरमकर संदिप दवने पंकज वाठोरे विजय डोंगरे कार्यक्रमाचे आयोजक शंकरदादा बगाटे यांनी केले तर सुत्रसंचलन विठ्ठलदादा पंडीत यांनी केले