✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(18जुलै):- पोलिस स्टेशन अंतर्गत माणिक नगर चिमुर व नेरी परिसरातील दारू साठा गुप्त महितीच्या आधारे जप्त करण्यात यश आले असून आरोपिला मुद्देमालासहित ताब्यात घेतले असून अन्य आरोपिचा पोलिस कसुन शोध घेत आहे,
चिमुर परिसरातील अवैध दारू विक्रेत्यावर पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यांचे नेतृत्वात पोलिस दिवस रात्र अवैध लपुन छपूण पाळत ठेऊन असताना दिनांक 18 जुलै रोजी मध्यरात्रि 2 वाजताच्या दरम्यान गुप्त सूत्राणी दिलेल्या महितीच्या आधारे आरोपी सौरभ चांदेकर, शानू शेख, किशोर नान्हें यानी आरोपी रामस्वरूप राजपूत माणिक नगर चिमुर याचे घरी देशी दारुचा मुद्देमाल ठेवला आसुन मुद्देमाल नेन्यासाठी सदर आरोपी मोटर साइकिल वरुण येत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसा झुंड़पात बसून असताना दोन मोटरसाइकिल येताना दिसताच त्यांचा पाठलाग केला असता सदर आरोपी मोटरसाइकल सोडून पळाले असता आरोपी रामस्वरूप भारतसिंग राजपूत यांचे राहते घरि रेड केली असता ऐकून देशी दारुच्या 19 पेटया, 2 मोटरसाइकल क्रमांक MH 31 DG 4819 व MH 34 AT 6335 असा 3 लाख 14 हजार रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी भारतसिंग राजपूत यास अटक केली असून बाकी आरोपिचा पोलिस शोध घेत आहे, तसेच नेरी परिसरातील आरोपी हेमंत संभाजी नगराले यांचे रहते घरि पोलिस उप नीरीक्षक किरण मेश्राम यानी रेड पाडली असता त्यांचे कडून 6500 रूपयाचा देशी दारुच्या मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून पूर्ण दोन्ही कार्यवाहिचा 3 लाख 20 हजार 900 रूपयाचा सम्पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
सदरची कार्यवाही पोलिस उपविभागीय अधिकारी अनुज तारे पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप नीरीक्षक किरण मेश्राम, पोलिस हवालदार विलास निमगड़े, विलास सोनुने, नायब पोलिस शिपाई किशोर बोढे, कैलास आलम, पोलिस शिपाई सचिन खामानकर, सुखराज यादव, सतीश झिलपे, रवि आठवले, विजय उपरे यानी पार पाडली.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED