✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा (दि.18 जुलै ):जगात सह देशात कोरोना मारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून यामध्ये कोरोना लढाईच्या महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्य कर्मचारी ,पोलीस विभाग महसूल विभाग ,स्वच्छता विभाग , पत्रकार,तसेच जनतेला या महामारी विषयी माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे पत्रकार मंडळी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे त्यांच्या कामाबद्दल सन्मान केला पाहिजे म्हणून अनेक सामाजिक संस्था या सर्व व्यक्तींचे मनोधैर्य वाढवण्याच्या हेतूने कोविड-19 पुरस्कार देत आहे .
शिर्डी येथील अत्यंत कमी वयात नावाजलेले व्यक्तिमत्व पत्रकार कुमारी किरण गोरख जाधव यांचा शौर्य मराठी न्युज तसेच आर के न्यूज योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे .
कुमारी किरण जाधव या केंद्रीय पत्रकार संघ अहमदनगर उपाध्यक्ष आणि शौर्य मराठी न्युज चे सहसंपादक आहेत .सध्याच्या च्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना त्यांच्या स्वतःची काळजी घेणे सॅनिटायझर ने सतत हात धुणे आणि यातील आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे, मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करण्यात यावी .नागरिकांनी मनोबल वाढवल्याने आणि जनजागृतीचे काम केले असून कुमारी किरण जाधव यांनी गोरगरिबांना मदत करण्याचे काम केले आहे तसेच परशुराम सेवा संघ अहमदनगर यांच्या वतीने कमलेश शेवाळे (महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख )यांच्या मार्फत कुमारी किरण जाधव यांना कोविड-19 सन्मानपत्र देण्यात आले आहे.प्रसारमाध्यमा सोबत बोलताना कुमारी किरण जाधव यांनी सांगितले की ,समाज सेवा करण्यातच ईश्वर सेवा आहे ,यापुढे समाजाच्या हितासाठी काम करेल असे त्यांनी सांगितले. कुमारी किरण जाधव कोरोना योद्धा म्हणून सन्मान मिळाला असून मिळालेल्या सन्मान बद्दल सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED