आर्त कथांची सार्थकता : मूल्यसापेक्षपणाची नवचेतना

28

आर्त कथांची सार्थकता हा पहिला कथालेखसंग्रह चरणदास वैरागडे यांचा नुकताच वाचण्यात आला. हा कथालेखसंग्रह मानवी मनातील विविध पदर उलगडवून दाखवणारा आहे .आर. के. प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेला हा कथालेखसंग्रह नव्या विचारांच्या पाऊलखुणा निर्माण करणार आहे .

चरणदास वैरागडे हे एक लेखक म्हणून मराठी साहित्यात नावारूपास येत आहेत. ते शिक्षक असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी ज्ञानविचार दिलेले आहेत. विद्यार्थ्यासोबत हितगुज साधने हा त्यांचा महत्त्वाचा एक पैलू या कथालेखसंग्रहातून वाचावयास मिळाला आहे.या कथालेखसंग्रहातील कथा लालीत्यपूर्ण ,संवादात्मक शैली यानी मोहरून आल्या आहेत. वाचकाच्या मनाना उत्तुंग भरारी देणारी आहेत. यासाठीच मी चरणदास वैरागडे यांचे अभिनंदन करतो.

आर्त कथांची सार्थकता हा कथालेखसंग्रहात एकूण ५० कथालेख गुंफलेले आहेत. प्रत्येक कथा स्वतःच सामर्थ्य घेऊन पुढे आलेले आहेत. ओघवती शैली व मनोविश्लेषणात्मक पद्धत याने हा कथालेखसंग्रह प्रगल्भ झालेला आहे.ध्येय प्राप्तीचा मार्ग धरा.. ही कथा आजच्या तरुणांना योग्य मार्ग दाखवणारी आहे . त्याचप्रमाणे देशाचा प्राण घुटमळतो या कथेतून कोरोना काळातील लोकांचे झालेले
हालअपेष्टाचे वास्तविक चित्रण अधोरेखित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा.. व संघर्षासाठी नेहमी तत्पर राहा . हा महामंत्र देशाला तारणार आहे .अशी वास्तविक भूमिका लेखकाने घेतलेली आहे. त्यामुळे हा कथालेखसंग्रह नव्या मूल्यविचारांचा अविष्कार करणार आहे .

वर्तमान भारतीय समाजातील जातीयतेचे शोषण कसे होत आहे यांचे चित्रण या कथेतून साकार केले आहे .ते यामध्ये लिहितात की ,”आमचा मर्द बाप अजूनही काही काळ जगला असता तर घायाळ सिंहासारखा गर्जला असता. या रणभूमीत पेनाच्या टोकानं,बुध्दाच्या डोक्यानं, आणि ताकतीच्या धाकाने नव्याने चित्त केली असती. ही पोखरलेली जुलमी समाजव्यवस्था”. हा विचार नक्कीच चिंतनात्मक आहे. त्याचप्रमाणे या कथालेखसंग्रहातील अनेक कथा मानवीय विचारांना उजागर करणा-या आहेत. अक्लेचा कांदा, संगत करावी सदा सज्जनाची, निराशा हाच माणसाचा शत्रू, श्रमाचे महत्त्व ,अति तिथं माती, समतेचा दिवा घरोघरी लावा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, संधीचं सोनं करा, तरुण मित्र लक्षात ठेव या कथांमधून समाजाला नवा संदेश दिला आहे.

चरणदास वैरागडे हे गरिबीच्या जीवनाने पोळले असले तरी त्यांनी गरीबीवर मात केलेली आहे. आपल्या शिक्षणातून नवा ध्यास घेतलेला आहे. झालेला त्रास त्यांनी सहन करून आपले आयुष्य फुलवलेले आहे.

शिक्षक हा विद्यार्थीपरायण व ज्ञान परायण असावा तसेच चरणदास वैरागडे आहेत. त्यांनी आपल्या शाळेमधून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा काम केले आहे. त्याचप्रमाणे समाजकारणातून आपली भूमिका प्रस्तुत केली आहे.या कथालेखसंग्रहातून त्याने भारतीय समाजातील असलेले विविध अवस्थांतरण मोठ्या खुबीने वाचकापर्यंत प्रस्तुत केलेले आहे. हा कथासंग्रह म्हणजेच मूल्यसापेक्षपणाची नवचेतना आहे. त्यामुळे या कथासंग्रहाचे यश नक्कीच उजेडमय आहे .चरणदास वैरागडे यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो आणि पुढिल नवीन साहित्य कृतीस मंगलकामना चिंतितो…..

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

आर्त कथांची सार्थकता
लेखक -चरणदास वैरागडे
प्रकाशक- आर .के प्रकाशन,नागपूर
सहयोगमूल्य-१०० रूपये