मोरणा नदीचा पात्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

23

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.18जुलै):-जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा नदीच्या पात्रात बिबट्या वाहून मृत झालेल्या अवस्थेत सापडला.या घटनेने वनविभागासह परीसरात खळबळ उडाली आहे.
माणगाव ता.पाटण येथे शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना मोरणा नदीच्या पात्रात मृतावस्थेत वाहून आलेला बिबट्या आढळून आला.मोरगिरी परीसरात पाऊस वाढल्याने मोरणा नदि दुथडी भरून वाहत आहे या पाण्याच्या प्रवाहातून हा बिबट्या वाहून आला.वनविभागाने तपासणी केल्यानंतर बिबट्याचे कातडे,नखे सुरक्षित असल्याने बिबट्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून आल्याने मृत झाल्याचे सांगितले,
वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी पंचनामा केला आहे.