राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाची बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी यशाची परंपरा कायम

34

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(19जुलै):-गांधी सेवा शिक्षन समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्यांनी यशस्वी होण्याची परंपरा कायम राखली आहे. ही शैक्षनिक अभिमानाची बाब आहे.बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेतुन मुक्त कामडी हिने महाविद्यालयातून व चिमूर तालुक्यातुन 84.76 टक्केवारी घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच वैभव रोकडे, निदा खान हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. तसेच कला विभागातून निखिल गूळधे, साक्षीता ननावरे, समीक्षा राऊत उच्च गुणांक्रमाने यशस्वी झाले आहेत. या वर्षीसुद्धा मुलीनी निकालात भरारी घेतली आहे.हे विशेष बाब.
       यावेळी विध्यार्थी वर्गानी कनिष्ठ महाविध्यालयीन
प्राध्यापकांनी बारावीच्या अभ्यासक्रमात मोलाचे मार्गदर्शन केल्याने यश गाठता आले, असे यशस्वी विद्यार्थी मंडळीनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    याचबरोबर गांधीसेवा शिक्षन समिती चे अध्यक्ष  डॉ. दिपक      यावंंले, उपाध्यक्ष सय्यद सर, सचिव कन्हया कापसे, तसेच समस्त संचालकमंडळ, व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कार्तिक पाटील यांनी गुणवंत  विध्यार्थी वर्गाना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राद्यापक व शिक्षकतेर कर्मचारी यांनी यशस्वी विध्यार्थी मंडळीचे अभिनंदन व कौतुक केले.