घोगरगावात आढळले तीन कोरोना बाधित – प्रतिबंधित क्षेत्र 25 जुलैपर्यंत सील

  40

  ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा प्रतिनिधी)मो:-9823503547

  श्रीगोंदा(दि.19जुुलै):-श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत,त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तहसिलदारांनी घोगरगाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले असूूून 25 जुलैपर्यंत गाव सील करण्यात आले आहे.

  पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णआढळल्यानंतर कोरोना ग्राम समितीने अगोदरच गाव बंद केले होते.अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घोगरगाव येथील एका 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल सरकारी लॅब मध्ये उत्तर खासगी लॅबमध्ये आला होता त्यामुळे उलट-सुलट चर्चा झाली होती.सरकारी अहवाल ग्राह्य धरून तहसीलदार महिंद्र माळी यांनी तात्काळ पावले उचलत घोगरगाव परिसर सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यांच्या आदेशानुसार 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत सर्व आस्थापणे, विक्री केंद्र ,बंद करण्यात आली आहे. तसेच गावातून बाहेर जाण्यास व गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  तत्पूर्वी सरपंच तथा कोरोना ग्राम समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी स्वतःच्या अधिकारात गावातील सर्व व्यवहार बंद केले होते.
  दरम्यान 17 जुलै रोजी रात्री उशिरा येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या पती-पत्नीला कोरोना ची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला अनेक गावांमध्ये अनेकांशी संपर्क आल्या चे समजतेमांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी जी कांबळे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहे.