आमदार भांगडीया यांचेसह कार्यकर्त्यावर लावलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निघाला मूक मोर्चा

39

🔺चिमूर बंद ला उत्तम प्रतिसाद

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.16मार्च):-चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया व त्यांच्या कार्यकर्त्यावर विनयभंगासह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे व खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी चिमुरात दि.16 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचा वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान चिमूर बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.

श्रीहरी बालाजी देवस्थान पासून प्रारंभ झालेला मूक मोर्चा चिमूर शहरातील व्यापार पेठेत फिरून तहसील कार्यालयात पोहचला. मुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. तहसील कार्यालय परिसरात मोर्चेकरांना भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर, डाँ.श्याम हटवादे, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, धरमसिंह वर्मा, महिला आघाडी अध्यक्ष मायाताई नन्नावरे यांनी मार्गदर्शन केले. मोर्च्यात हजारो पुरुष व महिला सहभागी झाले होते. सविस्तर वृत्त याप्रमाणे, चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर दिनांक 11 मार्च रोजी रात्रौ उशिरा चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले होते. आमदार भांगडिया व त्यांच्या कार्यकर्त्यांवर घरात घूसून हल्ला करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ही तक्रार सौ. शीतल अस्वमेध उर्फ साईनाथ बुटके यांची होती. दरम्यान आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्यावर भांदवी २९४ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या बाबतीत अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांनी वायरल केले. परिणामतः आमदार बंटी भांगडियासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्या घरी जमावाने आले होते. या वेळी साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी जाऊन त्यांच्यावर व कुटूंबियांवर हल्ला करून मारहाण केली असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

सदर घटनेच्या वेळी शेकडोच्या नागरिकांची गर्दी झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर साईनाथ बुटके यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन चिमूर येथे ठिय्या आंदोलन केले होते. आमदार बंटी भांगडिया यांनी साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके याचे विरोधात तर साईनाथ बुटके यांच्या पत्नीने यांनी आमदार व इतरांचे विरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रारी दाखल केल्या व पोलिसांनी दोन्ही तक्रारीवरून गुन्हे नोंद केले. आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ बुटके यांच्यावर अश्लील शिवीगाळ करणे संबंधाने संगणकीय प्राताधिकार भंग गुन्ह्याबरोबर भांदवी २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर अतात्विक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गोळा करून घरात घुसून हल्ला करणे संबंधाने आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह बब्बू खान , अमित जुमडे, निखिल भुते , गोलू भरडकर , आशिष झीरे , लल्ला असावा व अनेक कार्यकर्त्यांवर भादवी कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ३५४, २९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. सदर गुन्हे लावताना चिमूरचे ठाणेदार मनोज गभने यांनी शहानिशा न करता दाखल केले आहेत असा उल्लेख भाजपचे निवेदनात आहे. चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आशिष नोपाणी, ठाणेदार मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात मोर्चा दरम्यान तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.