महापुरुषांच्या पुतळ्या समोरील तांडा, ज्योती,नटराज बिअर बार हटवून मालकावर ॲट्रॉसिटी दाखल करा

28

🔸भीम टायगर सेनेचे सरसेनापती दादासाहेब शेळके यांची मागणी

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.१८मार्च):-एखाद्या व्यवसाय उभा करत असताना आर्टिकल 19 (6) नुसार तो मूलभूत हक्क जरी असला तरी हा व्यवसाय उभा करत असताना आरोग्य,कायदा,नैतिकता, सामाजिक एकता धोक्यात येता कामा नये हे संविधानाने सांगितले आहे.असे असताना नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळा व शहरातील इतर दारू व बारला परवानगी देऊन शासनाने कायद्याचे तीन तेरा वाजविले असून त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो भविष्यात काही जीवित हाणी झाल्यास त्यास शासन जबाबदार असेल.

पुढे आपल्या घणाघाती भाषणात दादासाहेब शेळके म्हणाले की, भारतीय संविधान भाग 4 राज्याची मार्गदर्शक तत्वे अनुच्छेद 47 नुसार जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे राज्य शासनाची जबाबदारी असून त्यासाठी दारू व इतर नशेली पदार्थावर बंदी घालणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असताना राज्य शासन पैशाच्या लालसे पोटी कायदा धाब्यावर बसवित आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2020 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) V नुसार आपल्या आदर्श व्यक्ती विषयी कोणत्या वस्तू व साधना द्वारे महापुरुषांची विटंबना होत असेल तर त्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात यावी असा ॲट्रॉसिटी कायदा सांगतो.

त्यामुळे देशी दारू, बार मालक व त्यांना परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ अट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी भिम टायगर सेना व बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तसेच बहुजन समाज पार्टी च्या वतीने आयोजित मनीषभाऊ कावळे राज्य प्रभारी यांच्या नेतृत्वात नांदेड येथील सर्व महापुरुषाच्या पुतळ्या समोरील बार व देशी व दारूचे दुकाने हटविण्या संदर्भात आयोजित धरणे आंदोलनाला भिम टायगर सेनेचा पाठिंबा जाहीर दिला आहे. सदर बार व देशी दारू दुकाने हटविण्या संदर्भात भविष्यात रोड वरील लढाई बरोबर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट व आर्टिकल 226 हाय कोर्टात लवकरच भिम टायगर सेना व बहुजन समाज पार्टी जाणार असल्याचे दादासाहेब शेवटी म्हणाले.

यावेळी भदंत पय्याबोधी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अड.संदीप ताजने , बहुजन समाज पार्टी मनीष भाऊ कावळे महाराष्ट्र प्रभारी बहुजन समाज पार्टी यांनीही मार्गदर्शन केले व युवा जिल्हाध्यक्ष विकीभाऊ वाघमारे संजय भगत भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क राष्ट्रपालदादा सावतकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.