खासजी शाळांनी पालकांना त्रास दिल्यास थेट फौजदारी कारवाई करणार-शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला इशारा

38

🔺उलट काही खासगी शाळांकडून पालकांना होत असलेल्या त्रासा मुळें ऑनलाईन शिक्षण पद्धतीसुद्धा बंद करण्याचं आपलं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.19जुलै) :-काही शाळा केवळ पालकांकडून फी घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग चालवत आहे. ज्या शाळांनी फी घेण्यासाठी ऑनलाइन शाळा सुरू केली आहे, अशा शाळांवर आता आपण स्वतः थेट कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज बोलताना दिला.

राज्य सरकार सध्या इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीची ऑनलाइन शाळा सुरू करू नका असे सांगत आहे. तरीही काही शाळा केवळ पालकांकडून फी घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग चालवत आहे. ज्या शाळांनी फी घेण्यासाठी ऑनलाइन शाळा सुरू केली आहे, अशा शाळांवर मी स्वतः फौजदारी कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

अमरावती विभागातील 1 लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनच नाहीच. ऑनलाइन शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नाही, शहरात राहणाऱ्या श्रीमंतांकडे मोबाईल आहे मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणप्रणालीत हे विद्यार्थी मागे राहणार नाही याचा विचार केला गेला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी वेळप्रसंगी शासन निर्णयसुद्धा बदलण्याचा प्रयत्न करू, असेही बच्चू कडू म्हणाले.

ज्या शाळा फी,शाळेचा गणवेश,मोबाईल,लॅपटॉपसाठी पालकांकडे तगादा लावत असतील अशा शाळांच्या तक्रारी पुराव्यासह आमच्याकडे द्या त्या शाळांवर आपण फौजदारी कारवाई येत्या एक दोन दिवसात करू असा इशारा देताना ते म्हणाले, की आपण अकोल्यातील अशा काही शाळांवर कारवाई करणार आहे. तसेच लवकर शाळेच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून शाळेच्या तक्रारी आल्यास शाळांना थेट कारवाईला सामोरे जावे लागेल.

गडचिरोली-चंद्रपुरातील शाळा 3ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सध्याची स्थिती बघता 3 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले. मात्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी, ना.वडेट्टीवारांनी 3ऑगस्ट पासून शाळा सुरु होण्याबाबत केलेलं विधान हे त्यांच्या पुरत आणि चंद्रपूरच्या परिस्थितीबाबत असू शकत असे स्पष्ट केले.