चिमूर चे उपजिल्हाधिकारी कार्यालय ९ आगस्ट पर्यत सुरू करा अन्यथा आंदोलन करणार-आमदार किर्तीकुमार भांगडीया

  41

  ?कार्यकर्त्यांनी केला आ.भांगडीया यांच्या वाढदिवस साजरा

  ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चिमुर(दि.19जुलै):-सर्वांचा सहकार्य मुळे मी आमदार बनलो असून कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने मला आकार मिळत आमदार पदावर पोहचलो. चिमूर क्रांती भूमीत सर्वात जास्त निधी खेचून आणला असून जनतेच्या सेवेकरिता चिमुर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय 9 आगस्ट पर्यत सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी गर्जना आ.भांगडीया यांनी केली.
          कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नेहमी सतत आपल्या सोबत राहण्याची ग्वाही दिली. प्रत्येक बूथ पिंजून काढण्यात आल्यावर अपेक्षे पेक्षा यश आले नसले तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ग्वाही देेेत आ.भांगडीया पुढे म्हणाले,कोणतेही कार्यकते नाराज नसून ते सर्व माझ्यासोबत राहून ढाल बनणार आहे,चिमूर चा चौफेर विकास करून कायापालट करणे हीच माझी आपणास परत भेट आहे. भाजपच्या शासन काळात उपजिल्हा कार्यालय चा दिलेला शब्द पूर्ण झाला असताना मात्र विध्यमान महाविकास आघाडी शासन कुटनीती ने थांबवत आहे परंतु चिमूर ची जनता चूप राहणार नाही येणाऱ्या 9 आगस्ट पर्यत चिमूर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला .

  आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाढदिवस निमित्य आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बकारामजी मालोदे होते. यावेळी जी.प.उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर,वसंत वारजूकर ,निलम राचलवार ,राजू देवतळे ,डॉ श्याम हटवादे ,डॉ दीपक यावले ,राजू पाटील झाडे, प्रकाश वाकडे, बंडूभाऊ नाकाडे ,प.स. सदस्य अजहर शेख आदी उपस्थित होते .

  आमदार बंटीभाऊ भांगडीया पुढे म्हणाले की, कोरोना कोविड महामारी मध्ये कोणतेही राजकिय संघटन पुढे आले नाही तेव्हा भारत माते ची सेवा करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते समोर आले, कार्यकर्त्यांच्या कुटूंबातील लोकांनी विरोध केला नाही त्या कुटुंबाचे अभिनंदन केले,सदैव प्रेम आशीर्वाद विश्वास असाच राहू द्या त्यामुळे मतदार संघात चौफेर विकास करता होईल ,
  सरकार येवो की नको काळजी करू नका, विकास करणे हेच ध्येय असल्याचे त्यांनी कार्यकत्याना सांगितले.

           दरम्यान विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. स्व.धापूदेवी गोठूलाल भांगडीया स्मृती प्रित्यर्थ सुकन्या योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले .

  प्रास्ताविक निलम राचलवार व संचालन विवेक कापसे यांनी केले.तर जयंत गौरकर यांनी आभार यांनी मानले .यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच मित्र मंडळी उपस्थित होते .