🔹महाराष्ट्र विज ग्राहक संघटना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शेगांव यांचे मुख्यमंञी यांना निवेदन

✒️शेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेगाव(दि.19जुलै):-देशात आणी राज्यात सध्या लाॅकडाउन लागु करण्यात आलेला आहे,त्याला आता 100 दिवसाच्यावर कालावधी लोटला असुन राज्य सरकारने 30 जुलै पर्यत त्यात वाढ केली आहे. या काळात अनेकाची रोजीरोटीच बंद असल्याने उदारनिर्वाह करतांना गरिब ,कष्टकरी,मध्यमवर्गीय या सर्वाचीच दमछाक झाली आहे ,त्यामुळे महावितरण कडुन तिन महिन्याचे विजदेयक येताच जनतेत अंसतोष निर्माण झाला आहे .त्यामुळे राज्य सरकारने दरमहा 300 युनिट पर्यत विज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती विज ग्राहकाची मागील 3 महिन्याची विज देयके माफ करावीत .

कोरोना विषाणुच्या साथीने देशात पाय पसरायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच पंतप्रधान नरेन्द् मोदी यांनी 25 मार्च पासुन देशात लाॅकडाउन ची घोषणा केली.गरिबाचा गाठीशी असलेला थोडा फार पैसाही संपत आला आहे, त्यामुळे अनेकाच्या मनात उपासमारीची व रोजगाराची भिती डोकावत आहे ,त्यात महावितरणकडुन आलेले भरमसाठ विज बिल कुठुन भरावे हा एक प्रश्न आहे. या पाश्वभुमीवर दरमहा 300 युनिट पर्यत विज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती विज ग्राहकाची विज देयके माफ करण्यात यावी व यासाठी आवश्यक त्या रक्कमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण व संबधीत कंपनीस कोविड पॅकेज किंवा अनुदान स्वरुपात देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्याकडुन  तहसीलदार, शेगांव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे  मुख्यमंञी महा यांच्याकडे करण्यात आली. सदर निवेदन देतांना भिकाजी वरोकार ,अंबादास पवार, पंकज शाहु, रितेश टेकडीवाल, श्रीराम खोंड, बाळकृष्णा भोजने, कुंदन इंगळे ,उपस्थीत होते.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED