डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभा करावी लागेल-डॉ. भीमराव य आंबेडकर

33

🔹समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापनदिनी डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते हेलीकॉप्टर वरून पुष्पवृष्टी

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.20मार्च):- डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभा करावी लागेल व समता सैनिक दलात किती ताकद आहे हे शाहीफेक प्रकरणामुळे दाखविले असल्याचे प्रतिपादन समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील पिंपरी -चिंचवड येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव य आंबेडकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) यांनी केले. डॉ भीमराव य.आंबेडकर यांनी हेलिकॉप्टरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व उपस्थित हजारो जनतेवर पुष्पवृष्टी केली.

त्यांच्या सोबत समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे ,समता सैनिक दलाचे विजय धर्मा ओहोळ,दिनेश बनसोडे हे होते. या कार्यक्रमास असिस्टंट स्टाफ ऑफिसर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे,मेजर जनरल पी एस ढोबळे आणि पुण्यातील मेजर सुरेश भालेराव,मेजर विनोद कांबळे,मेजर राजरतन थोरात,मेजर मल्हारी लोंढे,मेजर अनिल कांबळे,मेजर किरण आल्हाट इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मनोज गरबडे, आकाश इजगज आणि त्यांचे सहकारी यांनी पिंपरी चिंचवड युनिट च्या वतीने केले होते.

या प्रसंगी महापुरुषांच्या सन्मानार्थ झालेल्या शाहीफेक प्रकरणात सक्रिय सहभाग / पाठिंबा दर्शविल्या बद्दल *आंबेडकरी योद्धा* म्हणून डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मनोज गडबडे आणि त्यांचे सहकारी यांना मदत करणारे सुमारे 300 वकील ,विविध संघटना ,राजकीय पक्ष , व्यक्ती असे सुमारे दहा हजार मान्यवरांना गौरविण्यात आले.

प्रथम समता सैनिक दलाच्यावतीने 130 अधिकारी / सैनिक यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली .त्यानंतर बाल सैनिकांनी डॉ भीमराव आंबेडकर यांना जनरल सलामी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी समता ग्रंथालयाचे उदघाटन डॉ भीमराव आंबेडकर यांनी केले. भीमराव आंबेडकर ,सर्व सैनिक आणि उपस्थित असलेले हजारो जनतेने सामुहिक भारतीय संविधाना च्या प्रस्ताविकेची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.