आष्टी येथील ग्रा.प.गाळे बांधकामाची जि.प.स्तरावरून फेर चौकशी होणार-चौकशी समितीचे केले गठन

31

🔸Gram Panchayat Gale construction in Ashti will be re-inquired from the Z.P. level-Inquiry committee formed

🔹राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांच्या प्रयत्नाला यश

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी(दि.21मार्च):- तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीने नियम धाब्यावर बसवून दुकानाचे गाळे बांधकाम केले आणि या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. हे प्रकरण जनतेसमोर यावे तथा या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी यासाठी मागिल तीन वर्षांपासून सदर प्रकरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांनी वरिष्ठ पातळीवर लावुन धरले होते.

ग्रा.प. आष्टी येथील गाडे बांधकामात भ्रष्टाचार झाला असून यात ग्राम पंचायत सचिव इंद्रपाल बारसागडे हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांचे गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी. अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांनी 12 मार्च 2021 व त्यानंतर 2 मार्च 2023 रोजी केली होती. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली होती, मात्र त्या चौकशीतुन काहीही निष्पन्न झाले नाही. त्याकरिता सदर प्रकरण गडचिरोली जिल्हा परिषदेत पोहचले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांचे पत्र क्र. जीपग/साप्रवि/पंचा/स्था/7/2023 दि.8 मार्च 2023 नुसार उच्च स्तरिय चौकशी समिती गठीत केली आहे.

या चौकशी समिती मध्ये आरमोरीचे गट विकास अधिकारी चेतन हीवंज, गडचिरोली जिल्हा परिषद Texting विभागाचे शाखा अभियंता एस. टी. फाले, कुरखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. पी. भोगे, आरमोरी पंचायत समितीचे सहा. लेखाधिकारी रमेश मडावी यांचा समावेश आहे. ही समिती गठीत होताच चामोर्शी पंचायत समिती प्रशासनासह आष्टी ग्रा.प.प्रशासनात खळबळ माजली आहे.

या चौकशीतून भ्रष्टाचार समोर येईल का? याकडे आष्टी शहर वासियांचे लक्ष लागले आहे.