आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांनी निवड

    42

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.19जुलै):-“भारतातील पहिले राष्ट्रीय पत्रकार संघटना, ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष  यासिन पटेल यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावानुसार एकमताने करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांना राष्ट्रीय अध्यक्ष  यासिन पटेल, प्रदेशाध्यक्षा  अजिंक्य गोयकर, राष्ट्रीय समंवयक  आशुभाऊ इंगळे, राज्य संपर्क प्रमुख  तुळशीराम जांभूळकर ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघ” कोर कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नितीन रामटेके यांच्या पत्र कारिता क्षेत्रातील भरिव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांनी विशेष आभार मानले आहेत.

           मूळ गोंडपिपरी तालुक्यातील एका छोट्याश्या गावातील धामणगाव येथील निवासी नितीन रामटेके हे सामाजिक क्षेत्रात भावनिकतेने व अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत, तसेच त्यांना स्वतःचे व्यवसाय असून ते व्यापारी आहेत. याचसोबत काही दिवसापूर्वीच पत्रकार क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत. पत्रकारितेत काही दिवसापूर्वीच पदार्पण केलं असून कमी वेळात खूप यश प्राप्त केलं आहे. ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघाच्या’ गोंडपिपरी तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने तालुक्यातील सर्व पत्रकार संघ, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांचे सर्व मित्र मंडळी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.