प्रा. पंकज घाटे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट-Prof. Pankaj Ghate’s research patented by Government of India

43

🔹आक्साईड ची सुक्ष्मतम संरचना तयार करण्याची प्रक्रीया शोधली

🔸Discovered the process of creating the finer structure of the oxide

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर,तालूका प्रतिनिधी )

चिमूर(दि.22मार्च):-नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे भौतीक शास्त्र विभागात कार्यरत प्रा पंकज घाटे यांच्या संशोधनाला भारत सरकार चे पेटंट प्राप्त झाले आहे. ए प्रोसेस फॉर सिंथेसीस ऑफ ऑक्साईड नॅनोस्ट्रकचर मटेरियल A Process for Synthesis of Oxide Nanostructured Materials या विषयावर त्यांनी आपले संशोधन करून इंटेलेक्चुअल प्रापर्टी इंडीया ला सादर केले होते. नुकतेच त्यांना पेटंट प्रमाणीत करण्यात आले असुन त्याचे तालुकास्तरावर अभिनंदन होत आहे.

दैनंदीन वापरात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ऑक्साईड चा वापर करण्यात येत असुन त्याच्या सुक्ष्म संरचनेचा उपकरणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. ऑक्साईडची सुक्ष्मतम रुपात असलेली संरचना तयार करण्याची प्रकिया शोधून काढल्याने आता काही उपकरणांची गुणवत्ता वाढण्यास मदत मिळणार आहे. ज्यामध्ये एल ए डी बल्ब, सुपर कॅपॅसिटर, इंधन वाचवीनारे उपकरण आदींचा समावेश आहे.

सदर संशोधन कार्य लक्ष्मीनारायन इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर Laxminarayan Institute of Technology Nagpur चे पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ. प्रा. विजय पडवे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चे भौतीकशास्त्र विभाग प्रमूख डॉ. प्रा. संजय ढोबळे यांचे मार्गदर्शनात पुर्ण केले असुन त्यांनी भौतीक शास्त्र विषयातील पदार्थाची दहाचा घातांक वजा नऊ (नॅनोस्ट्रकचर ) अवस्था तयार करण्याची विधी शोधून काढण्यात यश संपादन केले आहे. नेहरू कनिष्ठ महावियायाचे प्राचार्य घनशाम कढव, उपप्राचार्य निशिकांत मेहरकुरे, पर्यवेक्षक उमरे, मिलमीले यांनी अभिनंदन केले आहे.

@सोपी व स्वस्त पद्धती – पंकज घाटे
सदर पद्धती शोधण्याचे कार्य २०२० मध्ये सुरु केले होते. ही पद्धती सोपी व परवडणारी असुन इलेक्ट्रॉनीक उयोगात नवी क्रांती ठरणारी आहे. सदर संशोधन पेटंट हे २० वर्षाकरीता प्राप्त झाले आहे.