मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावा — आमदार देवेंद्र भुयार

31

🔸मतदार संघातील प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्याची मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.22मार्च):-२०२३ २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकासकामांसह शेतकरी शेतमजूर सर्व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये वरूड शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे चुडामन नदीला महापूर आल्यामुळे त्यामध्ये तब्बल ७०० घरांचे नुकसान झाले तसेच मोर्शी शहरांमधे २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे ४५० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भविष्यात अतुरुष्टी व महापुरामुळे नागरिकांच्या घरांचे नुकसान होऊ नये यासाठी वरूड व मोर्शी शहरांमध्ये चुडामन नदी व नळा दमयंती नदीवर प्रोटेक्शन वॉल बांधकाम करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार रेटून धरली. वरूड मोर्शी शेंदूरजना घाट शहराचे पिआर कार्ड तयार करण्यात आलेले नाही नसून वरूड मोर्शी शेंदूरजनाघाट शहराचे सिमांकन करून शहरातील नागरिकांना प्यार कार्ड देण्यात यावे.

मोर्शी शहरांमध्ये पाटबंधारे विभागाची १०० एक्कर जागा शिल्लक असून ती जागा गृह निर्माण संस्थेला देऊन त्यावर प्लॉट पाडून घरकुलासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, मोर्शी शहराला लागूनच अप्पर वर्धा धरण असून सुद्धा मोर्शी शहराला शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा होऊ शकत नसल्यामुळे मोर्शी शहरातील पाणी पुरवाठयाचा डीपीआर शासनाकडे सादर केला असून मोर्शी शहरातील ४० हजार नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य शासनाला पाठविलेला डीपीआरला तत्काळ मान्यता देण्यात यावी, मोर्शी वरूड शेघाट शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान भाग २ अंतर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून वरूड शहराचा ३२ कोटी रुपयांचा डीपीआर शासनाकडे सादर केल्यामुळे मोर्शी वरूड शेघाट येथील प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी.

मोर्शी वरूड शेघाट हे तिन्ही शहर स्मार्ट सिटी करीता प्रस्तावित केले असून या शहरांना स्मार्ट सिटी करण्या करीता भूमिगत विद्युत वहिनी करणेसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून त्याला शासनाने १२४ कोटी रुपयांची मान्यता दिली असून अद्यापही त्याची निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी सभागृहात व्यक्त केली असून तत्काळ निविदा प्रक्रिया रबऊन कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. वरूड शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू करणे, वरूड शहरांमध्ये १०० बेडच्या उपजिल्हा रूग्णालयाला शासनाने मान्यता दिली असून वरूड येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जागा चांगल्या स्थितीमध्ये असल्यामुळे त्या जागेवर कुटीर रुग्णालय निर्माण करून वरूड शहरातील नागरिकांना सोई सुविधा निर्माण कराव्या.

विदर्भातील प्रसिद्ध नागपुरी संत्राला रेल्वे स्थानकावर संत्रा विक्री करिता जागा उपलब्ध करून द्यावी तसेच बाहेर देशातून पल्प आणि ज्यूस आयातीवर जात कर लादून आपल्या नागपुरी संत्राचा पल्प ज्यूस ला चांगला भाव मिळू शकेल त्यासाठी प्रयत्न करावा व संत्रा पिकाला नामांकन मिळउन संत्रा पिकाला आंतर राष्ट्रीय दर्जाचा प्रोटोकॉल मिळावा, वरूड येथे मला मुलींचे वसतिगृह निर्माण करावे तसेच पार्डी व सातनुर येथे विपश्यना सेंटरला मान्यता देण्यात यावी यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिनांक २१ मार्च रोजी २३-२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर नगर विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सहकार व पणन विभागासह आदी प्रश्न उपस्थित करून विकास कामे मंजूर करून भरीव निधी मंजूर करण्याची मागणी अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये केली.