लॉकडाऊन मुळे सद्या सत्यशोधक विवाह घराचे अंगणात होऊ लागल्याने नाते तर घट्ट झालेच सोबत मोठी आर्थिक बचतही झाली – रघुनाथ ढोक

62

🔹सिन्नर ग्रामीण परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह माळी आणि जाधव यांचा संपन्न झाला.

✒️सिन्नर(मुसळगांव)-(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिन्नर(मुसळगांव)दि.20जुलै:-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सामाजिक कार्यकर्ते गोविंद खंडू माळी(कानडे) यांची मुलगी सत्यशोधिका माया माळी FYBcom आणि सत्यशोधक संग्राम सोपान जाधव फक्त 10वी तरी देखील कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधे व महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले पद्धतीने वधुचे रहाते घरी अमृता फॉर्म,मुसळगांव येथे रविवार दि.19 जुलै 2020 रोजी सकाळी.10 वाजता संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे,माजी नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे,महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वाजे,कांताराम माळी,मनीष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हा विवाह कोव्हिडं 19 चे नियमाप्रमाणे व अंधश्रद्दा , कर्मकांड यांना फाटा देत सत्यशोधक पद्दतिने पुणेचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावून,वैदिक व रजिस्टर पद्धतीपेक्षा सत्यशोधक विवाह पद्धत कशी योग्य आहे याची माहिती दिली. लॉकडाऊन मुळे विवाह कमी आणि मोजके नातेवाईक मध्ये सम्पन्न होऊ लागल्याने जवळचे नाती दृढ झाली आणि आर्थिक बचतही होत आहे असे सांगून विवाहाचे वेळी
महात्मा फुले रचित मंगलाषटकाचे गायन देखील रघुनाथ ढोक यांनी केले.
या विवाहाची रजिस्टर नोंदणी करून वधू वर यांना याप्रसंगी बहुउद्देश्यीय सत्यशोधक केन्द्रातर्फे सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे यांचे हस्ते भेट दिली तर वर वधु व पालकांचे हस्ते विशेष करून सत्यशोधक शामराव कुलट यांचे *भटजीच वधूचा नवरा* *अथवा पुरोहितां चे पापे* हे पुस्तक सर्वांनाच भेट दिले यामुळे नक्कीच समाजाचे प्रबोधन होणार आहे .तसेच पालकांनी व वधु मायाने जन्मतारीख न सांगता उमदेवारी जाहीर केली होती आणि संग्राम व त्याचे पालकांनी काहीही न पहाता ही वधु स्वीकारून आज सत्यशोधक विवाह ग्रामीण भागातील पहिला पार पाडला म्हणून सर्वांनीच दोन्ही कुटुंबाचे कौतुक केले.यावेळी आई वडिलांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आवर्जून *सन्मानपत्र* देऊन आभार मानले. तसेच रघुनाथ ढोक यांनी संस्थेच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट देऊन स्वागत केले तर त्यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन फुले शाहु आंबेडकर यांचे मौलिक विचार मांडले तसेच नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे यांनी संस्थेचे व ढोक यांनी पुणे वरून येऊन मार्मिक माहिती देत मोफत विवाह लावला म्हणून अभिनंदन केले.
सुरुवातीला वधु वर यांचे हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण करून भारतीय राज्य घटना ,महात्मा फुले समग्र वाड्मय या राष्ट्रीय ग्रंथाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज,लोकराजा शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो चे तसेच आज संत शिरोमणी सावता महाराज यांची 725 वी पुण्यतिथी म्हणून प्रतिमांचे पुजन व त्यांचे अभंग *कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी* याबाबतचे विवेचन देखील रघुनाथ ढोक यांनी केले. यावेळी भारतीय संविधान चे वाचन व आजचा विवाह जुळविणारे दीपक मंडलिक यांनी केले तर मोलाचे सहकार्य सारथी असो. संघटचे अध्यक्ष योगेश ढगे ,समता सैनिक आकाश ढोक यांनी केले तर विवाहाचे स्वागत प्रस्थाविक गोविंद माळी आणि आभार प्रदर्शन सोपान जाधव यांनी मानले.