मूर्तिकार श्रवण आक्केवर चा गौरव सोहळा

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23मार्च):-एक मूर्तिकार आपल्यातील कौशल्य पणाला लावून मूर्तीला सौंदर्य तसेच जिवंतपणा प्रदान करतो. मातीच्या गोळ्यात प्राण फुंकतो, कौशल्य संपन्न, कुशल कारागीर, कुशल मूर्तिकार श्रवण आक्केवार यांचा रंजन सामाजिक मंचच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष नरुले, सत्कारमूर्ती श्रवण आक्केवार,रंजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, सचिन बरबटकर,डॉ राहुल विधाते, मनोज ताटे, कार्तिक आक्केवार, स्वप्निल सुत्रपवार, गणेश कन्नाके, नितीन चांदेकर, मोहन जीवतोडे, वसंत भालमे, आदी उपस्थित होते. सुभाष नरुले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले श्रवण हा अतिशय होतकरू मुलगा त्याची परिस्थिती जेमतेम, हलाखीची परंतु त्याची जिद्द व चिकाटीमुळे तो एक उत्कृष्ट मूर्तिकार घडला. त्याला मूर्तिकाराचा कुठलाही वारसा नाही.

परंतु इच्छा तिथे मार्ग मिळतो हे अगदी खरे आहे तोच धागा पकडून तो गणपती, दुर्गा देवी, शारदा देवी व इतरही देवी,देवता,तसेच महापुरुषांच्या मुर्त्या घडवितो. एकदा ठरवलेले लक्ष तो पूर्ण करतो आज तो उधोंमुख मूर्तिकार म्हणून चंद्रपुरात प्रसिद्धीच्या झोतात आहे. मूर्ती साचेबद्ध व रंगरंगोटी अगदी आकर्षक व अप्रतिम असते जणू साक्षात मूर्तित प्राण फुंकले असावे असे वाटते. असा हा उभरता मूर्तिकार त्याच्या कलेची पारख करून त्याचा रंजन सामाजिक मंच चंद्रपूर तर्फे सत्कार समारोह समारंभ घेण्यात आला.कार्यक्रमाला मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला