प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा अमरावती येथे अमृत महोत्सव अंतर्गत आझाद हिंद ची गाथा नाटयाचे प्रस्तूतीकरण

30

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.23मार्च):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी ,कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्हयांत एकाच दिवसी 75 महाविद्यालये,75 ठिकाणी, 75 नाट्य प्रयोग सादरीकरण, या अनोख्या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक हयूमन्स संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 75 महाविद्यालयातील एक असे अमरावती जिल्यांतून प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा अमरावती येथील विद्यार्थ्यांद्वारे सदर नाटक सादरीकरण करण्यात आले. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्याचा एक दिवस, भारताच्या प्रवासाची कहाणी आणि,अमृत महोत्सवाची भावना साजरी करण्याची एक खरी संधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय, आर्टिस्टिक हयूमन्स आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने महाविद्यालयाला मिळवून दिली.

महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे दिनांक 23 मार्च 2023 ला दुपारी 12.00 वाजता या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले तसेच नाटकाचे आयोजित झूम मिटिंग द्वारे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यापुढे सादरी करण करण्यात आले. सदर नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी अमरावती जिल्हयांतील सर्व रसिक बांधव सादर आमंत्रित होते तरी जास्तीत जास्त संख्येने रसिक बांधव आणि विद्यार्थी यांनी या नाटकाला उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान केला.

नाटकाचे यशश्वी आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष सायवान यांनी सह -कार्यक्रम अधिकारी, प्रा शुभम कदम, प्रा. विजय खंडार तसेच विद्यार्थी सुरज शर्मा, शंकर उचितकर, वेदांत वंदिले, वैष्णवी सोलव, साक्षी गाडबैल, वैष्णवी राऊत, सुरज मुंडे, अवंतिका खांडेकर, ख़ुशी भैसारे, प्रथमेश सवाई, आदित्य मसराम, अनघा सराफ, प्रथमेश कुकडे, मधुर शर्मा, चैताली महल्ले, तनुजा खोब्रागडे, प्रथमेश वानखडे यांनी सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपप्राचार्य, संगाबाअवि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेश बुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सन्माननिय सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले

ज्यांनी या कार्यक्रमाणी कल्पना केली, अशे, आर्टिस्टिक ह्युमन्सचे संस्थापक आणि संचालक, दर्शन महाजन म्हणाले,
“अमृत महोत्सव ही सर्वांना एकत्र आणण्याची उत्तम संधी आहे. मा. पंतप्रधान यांचे शब्द मला प्रकर्षाने आठवतात. ‘हा अमृत महोत्सव प्रत्येक मनाचा, प्रत्येक नागरिकाचा उत्सव असावा..’ गेल्या दोन वर्षांत, कोरोना मुळे विद्यार्थी अनेक आव्हानांना सामोरे गेले आहेत. त्यांच्यासाठी संधी निर्माण करून सर्वांना एका समान व्यासपीठावर आणण्याची गरज होती. आणि रंगभूमी हे सर्वांना एकत्र आणण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. आणि कृतज्ञतेसह, मला हे सांगताना आनंद होत आहे की या प्रकल्पाने 1000+ विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, संस्था, नागरिक आणि सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे.

मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानू इच्छितो, विशेषतः श्री. विभीषण चौरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय) ज्यांनी आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवला, आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि श्री. विकास चंद्र रस्तोगी, IAS (प्रधान सचिव), उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांशी जोडण्यास संधि देण्यासाठी.”